साफ करण्याची मागणी : नागरिकांना त्रास कोगनोळी : कुरली तालुका निपाणी येथील वेदगंगा नदी घाटावर चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब चिखल व इतर घाणीची स्वच्छता करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे. कुरली येथील वेदगंगा नदीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घाट बांधण्यात …
Read More »सीपीआय बी. एस. तळवार यांचा सत्कार
कोगनोळी : निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पदी बी. एस. तळवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी कोरोना काळात अत्यंत चांगले …
Read More »कोगनोळीत तुंबलेल्या गटारीची स्वखर्चाने केली स्वच्छता; ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष
कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावरील अंबिका पतसंस्थेसमोर गेल्या कित्येक महिन्यापासून गटार तुंबली होती. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तसेच गटारीवर गवत व झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तसेच गटारी तुंबल्याने डासांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुख्य …
Read More »दूधगंगा बचाव कृती समितीशी बांधील : माजी आमदार काकासाहेब पाटील
कोणत्याही लढ्यासाठी तयार निपाणी (वार्ता) : सुळकुड येथील दूधगंगेतील पाणी इचलकरंजी शहराला देण्याची मागणी होत आहे. या योजने संदर्भात दूधगंगा बचाव कृती समिती जो निर्णय घेईल, त्याला आपण बांधील आहोत. या पाण्यावर कर्नाटक सीमा भागातील अनेक गावे अवलंबून आहेत. सदरचे पाणी इचलकरंजीला दिल्यास या भागातील पिण्यासह शेती पाण्याचा प्रश्न …
Read More »पालकांच्या पाठिंब्यामुळेच निश्चित ध्येय गाठणे शक्य
उपनिरीक्षक शिवराज नायकवडी : मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : सध्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार संबंधित क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे त्यांना पाठबळ दिल्यास ते विद्यार्थी निश्चित ध्येय गाठू शकतात, असे मत ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी व्यक्त केले. उत्तर कर्नाटक रिक्षा चालक-मालक …
Read More »विविध रंगी, नक्षीच्या राख्यांनी निपाणी बाजारपेठ सजली
१० ते २० टक्क्यांनी राख्या महागल्या निपाणी (वार्ता) : बहीण-भावांचे नाते अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण २ दिवसांवर येऊन ठेपल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठेत विविध रंग आणि नक्षीच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. विविध रंगांच्या सुती धाग्यापासून या राख्या बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध आकार आणि डिझाईनचे मनी, …
Read More »दूधगंगेतून इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध
कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांचा सहभाग; आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्धार निपाणी (वार्ता) : दूधगंगा बचाव कृती समितीच्याच्या वतीने कोल्हापूर येथील शासकीय विश्रागृहात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील नेत्यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यामध्ये कर्नाटक सीमा भागातील नेते मंडळीसह शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास सुळकुड योजनेतून पाणी देण्यास विरोध दर्शवला. शिवाय …
Read More »युवकाच्या आत्महत्येप्रकरणी ५ जणांवर गुन्हा
निपाणी (वार्ता) : येथील दलाल पेठ येथे केशव किरण शिंदे (वय २५) (रा. जत्राट वेस, ढोर गल्ली) या युवकाने भाडोत्री व्यवसायाच्या ठिकाणी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान या आत्महत्या प्रकरणी मयत केशव यांचे वडील किरण शिंदे यांनी केशवच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. …
Read More »निपाणी हालशुगर निवडणुकीचे बिगुल वाजले
१६ सप्टेंबरला मतदानासह मतमोजणी; निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष निपाणी (वार्ता) : येथील श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याला नुकताच मल्टीस्टेटचा दर्जा प्राप्त झाला आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत आलेला हा कारखाना खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या पाठबळातून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली …
Read More »नाशिक महामेळाव्यात अक्कोळच्या डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : श्री.सद्गुरू स्वामी महाराज यांच्या ५१ व्या पुरुषोत्तम मास त्रैमासिक पुण्यतिथी उत्सवानिमित्त नाशिक पंतभक्त परिवारातर्फे नाशिक येथे महामेळावा व बोधपीठ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा श्रीपंत बोधपीठाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत पंतबाळेकुंद्री (ठाणे) यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta