Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

पाकाळणी कार्यक्रमाने निपाणी उरुसाची सांगता

चव्हाण वारसासह मानकर -याकडून नैवेद्य :१५ दिवस चालणार कंदुरीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरुसाला रविवारी (ता.६) पासून सुरूवात झाली होती. रविवारी (ता.७) संदल बेडीवाल्यांच्या भर उरूस झाला होता. त्यानंतर चव्हाण वाड्यात चव्हाण वारस व मानकरी ऊरुस कमिटी पदाधिकारी यांच्या …

Read More »

उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिनी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप

मडिवाळ समाजाचा स्तुत्य उपक्रम निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उद्योजक अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या 47 वा वाढदिवस निमित्त येथील मडिवाळ समाजाच्या वतीने समाजाचे प्रमुख पैलवान बाळासाहेब माडिवाळ व मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम राबवून …

Read More »

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अरिहंत’ समूहाचे कायम पाठबळ

  युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निरंतर पणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. युवा …

Read More »

सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिस्टर ए. एच. नदाफ यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बेन्नी म्हणाले की, कर्नाटक …

Read More »

निपाणी मतदारसंघात पानंद रस्त्यासाठी 46 कोटी रुपयांचे अनुदान

  हंचिनाळ येथे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पानंद रस्त्याचा शुभारंभ हंचिनाळ : निपाणी विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानातून. 50 55 योजनेअंतर्गत 46 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यातून मतदारसंघात दर्जेदार पानंद रस्ते होणार असल्याचे प्रतिपादन चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. हंचिनाळ ता. निपाणी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या …

Read More »

सतीश जारकीहोळी यांच्या बदनामीच्या विरोधात कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा

  संभाजी राजे चौकात मानवी साखळी : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे सर्व जातीधर्मांचा आदर करणारे आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य हे कोणत्या धर्माविरोधात नव्हते. तर केवळ एका शब्दाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. त्याला ऐतिहासिक व साहित्यिक आधार होता. असे असताना काही …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदीत 70 वर्षीय इसमाचा मृतदेह

    कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीत 70 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवार तारीख 10 रोजी सकाळी उघडकीस आली. सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील ज्ञानदेव दामू पाटील असे नाव असल्याचे प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदीमध्ये …

Read More »

निपाणीत शनिवारपासून फुटबॉल स्पर्धा 

अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धा : लाखाचे पहिले बक्षीस निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल ॲकॅडमीच्या आयोजनाखाली उत्तमअण्णा युवा शक्ती व अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने शनीवार (ता.१२) पासून समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. प्रेक्षकांच्यासाठी गॅलरी, खेळाडुंच्या जेवण व राहण्याची …

Read More »

निपाणी ऊरूसातील मानाच्या फकीरांची रवानगी

कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान ‌अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमित्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली. यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात एकाचा मृत्यू

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार तारीख 8 रोजी संध्याकाळी आठ वाजता घडली. सिद्धार्थ आनंदा कांबळे (वय 48) हालसिद्धनाथ नगर कोगनोळी असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुळगाव दिंडेवाडी तालुका भुदरगड, सध्या …

Read More »