Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

जीवन गौरव पुरस्काराने राजेंद्र पणदे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : येथील आर्किटेक ऑफ इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील ज्येष्ठ अभियंते राजेंद्र पणदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन बोरगावमधील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी असोसिएशनचे सदस्य व माजी सभापती अजय माने …

Read More »

अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग स्पर्धेत यश 

निपाणी (वार्ता) : मुरगुड नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मश खुल्या स्केटिंग स्पर्धेत निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत शाळेच्या एकूण२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये श्रेयस मार्तंड, निनिक्षा जाधव, आर्यन चव्हाण, चिन्मय लोळसुरे, अक्षय पाटील, तनुष …

Read More »

बोरगावमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच

कोल्ड स्टोरेज येथे चोरीचा प्रयत्न फसला : नागरिक भीतीच्या छायेखाली निपाणी (वार्ता) : बोरगाव- इचलकरंजी रस्त्यालगत असलेल्या रोहिले कोल्ड स्टोरेज या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांनी पलायन केले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी चोरीचा प्रयत्न होणारी महिन्यातील ही तिसरी घटना असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे …

Read More »

चोरांपासून सावधान, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपनिरीक्षक एस. भरतगौडा

बोरगाव येथे सार्वजनिक ठिकाणी जनजागृती निपाणी (वार्ता) : सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सध्या ग्रामीण भागात चोरींचे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही चोरीच्या घटना वाढत आहेत. अशा चोरी व चोरांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगून सतर्क रहावे. याशिवाय लहान मुले पळविण्याच्या अफवा बसविल्या जात आहेत त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे काही …

Read More »

डॉ. विश्वेश्वरय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभियंत्यांनी काम करावे

  युवा नेते उत्तम पाटील : निपाणीत अभियंता दिन साजरा निपाणी (वार्ता) : देशाच्या जडणघडणीमध्ये डॉ. एम विश्वेश्वरय्या यांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. कोणताही उद्योग आणि व्यवसायात मनापासून कार्य करत असतानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठी केंद्र व राज्याचे धोरण एकत्र आणणे साध्य होत …

Read More »

चिकोडी जिल्ह्यासह विद्युत्त विभागाचे खाजगीकरण थांबवावे

  कर्नाटक राज्य रयत संघटना : माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा ‌रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील विविध समस्या घेऊन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कावेरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रखडलेल्या चिकोडी जिल्हा मागणीची तात्काळ अंमलबजावणी करावी. विद्युत्त विभागाचे खाजगीकरण झाल्यास शेतकऱ्यांचे …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदी परिसरात घाणीचे साम्राज्य

दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात, नदीचे प्रदूषण रोखणे गरजेचे कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (तालुका निपाणी) येथील दूधगंगा नदीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूलाही कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. लोकांचे आरोग्य धोक्याचे बनत असल्याने या नदीचे प्रदूषण …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नका : संजयकुमार

ग्रामीण पोलिसमार्फत कुर्ली हायस्कूलमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : मुले पळविणारी टोळी आली आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. कोणतीही संशयास्पद घटना परिसरात घडत असल्याचे वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. त्यावर पोलिस कारवाई करतील. कुणीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वासही …

Read More »

सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाबद्दल मान्यवरांचा सत्कार

 निपाणी (वार्ता) : महादेव गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने त्यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार झाला. त्या अनुषंगाने मुस्लिम समाजातील  सेवाभावी व्यक्तिमत्व आणि निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती अल्लाबक्ष बागवान यांचा सत्कार मंडळाचे सदस्य चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश …

Read More »

मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये

मंडळ पोलीस निरीक्षक शिवयोगी : शहर ग्रामीण भागात पोलिसातर्फे जनजागृती निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात लहान मुले चोरणारी टोळी आणि नागरिक सक्रिय झाल्याची अफवा गेल्या काही दिवसापासून सुरू झाली आहे. त्याबाबत समाज माध्यमावरही अनेक अफवा पसरल्या जात आहेत. अशी कोणतीही टोळी अथवा नागरिक नसून त्यावर नागरिकांनी …

Read More »