यल्लीमन्नोळी फाट्यावर कारवाई संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलीसांनी सापळा रचून चोरीछुपे, बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणारे आरोपी अजय उर्फ अमर सुभाष कोळी (वय २४) राहणार तळवार गल्ली संकेश्वर, बबलू राजासाठी नाईकवाडी राहणार सोलापूर तालुका हुक्केरी यांच्याकडून लाल रंगाच्या प्लॅस्टिक कॅरी बॅगमधील २२५ …
Read More »निपाणीतील रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा!
कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती : गुरूवारी होणार रथोत्सव निपाणी (विनायक पाटील) : येथील महादेव गल्लीतील श्री महादेव मंदिरामार्फत महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणारा रथोत्सव म्हणजे असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या रथोत्सवाने दैदिप्यमान इतिहास व परंपरा जपली आहे. प्रतिवर्षी भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होणारा श्री महादेवाचा रथोत्सव भाविकांचे आकर्षण ठरला …
Read More »स्केटिंगपटू प्रितमला गोल्ड काॅईन
आरोही-राहीला रजतपदक संकेश्वर (प्रतिनिधी) : सांगली रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातून ३२० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत संकेश्वर रोलर स्केटिंग ॲकॅडमीचा स्केटिंगपटू प्रितम कल्याणकुमार निलाज (ओरिजनल) इनलाईन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड काॅईनचा मानकरी ठरला आहे. १० वयोगटातील स्पर्धेत प्रितमने पुणे-मुंबई येथील …
Read More »’गोमटेश’मध्ये जागतिक विज्ञान दिन साजरा
निपाणी : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विज्ञान उपकरणांचे सादरीकरण केले. विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध मॉडेल्स या …
Read More »कल्पकतेला संधी देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनांची गरज
रेवती मठद : विज्ञान प्रदर्शनात कागलची पूर्वा माणगावे प्रथम निपाणी (वार्ता): प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जन्मत: एखादी अभूतपूर्व कला असते. त्याला संधी देण्याचे काम शाळा करते. शालेय अभ्यासातील प्रयोगातून विज्ञानाची गोडी वाढते. पण विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संधी मिळते. यासाठी प्रत्येक शाळांतून अशी प्रदर्शने भरविण्याची गरज असल्याचे मत, निपाणी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद …
Read More »संस्कार किराणा दुकानात विकत मिळत नाही : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संस्कार किराणा दुकानात विकत मिळत नाही. आई-वडीलांनी मुलांना बालपणात संस्कार द्यावे लागतात. मुलांना शिक्षणाबरोबर संस्कारसंपन्न घडविण्याचे कार्य पालकांनी करायला हवे असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते निडसोसी महाशिवरात्री जात्रा महोत्सवात सहभागी होऊन बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम …
Read More »सौंदलगा येथे महाशिवरात्री भक्तीभावाने साजरी
सौंदलगा : येथील श्री महादेव मंदिरामध्ये सकाळी अभिषेक, रुद्राची अकरा आवर्तने, श्री सूक्त, 108 नामावली आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात झाले. या धार्मिक कार्यक्रमाच्या यजमानपदी डॉ. सुहास कुलकर्णी, नचिकेत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी हे होते. या सर्व धार्मिक विधीचे पौराहित्य मुकुंद जोशी, शशिकांत जोशी, अंबादास बावडेकर, प्रदीप जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, प्रसाद जोशी, …
Read More »निपाणीत ’हर, हर महादेव’चा गजर!
रांगोळीतून साकारल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या मुर्त्या : भाविकांची दर्शनासाठी गर्दी निपाणी (वार्ता) : शहर परिसरात विविध ठिकाणी मंगळवारी (ता. 1) महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले. शहरातील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी झाली होती. चांदीच्या पालखीत उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. शहरासह …
Read More »लसीकरणाची गरज शासनालाच?
दुसर्या डोससह बुस्टर डोसला नकारघंटा कायम : केवळ 1756 बुस्टर डोस पूर्ण निपाणी (वार्ता) : तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या निपाणी तालुका पाहण्यास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसर्या डोससह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र …
Read More »’देवचंद’ मध्ये विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): देवचंद महाविद्यालयापासून सुरु होणार्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या कला शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आणि गुणगौरव समारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्राप्त डी.टी.एस.( देवचंद टॅलेंट सर्च) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विद्यार्थ्यांना …
Read More »