Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेस भाविकांची किरकोळ गर्दी

कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय.. चांगभलच्या गजरात येथील कुर्ली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेला शुक्रवार तारीख 22 रोजी पासून सुरुवात झाली. सकाळी कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथे आल्यावर आप्पाचीवाडी पालखी, कुरली पालखी, अश्व, छत्री सबिना खडक मंदिरात आणण्यात आला. विविध धार्मिक …

Read More »

ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान महत्त्वाचे

गणपतराव पाटील : महालक्ष्मी संस्थेचा रौप्यमहोत्सव निपाणी (वार्ता): सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार्‍या एकमेव अशा असून सहकारी संस्थामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार मिळत आहे. कुन्नूरसारख्या ग्रामीण गावात शरदचंद्र पाठक यांनी चालवलेली महालक्ष्मी सौहार्द संस्था त्यापैकीच एक आहे. या संस्थेने केवळ सहकार तत्त्व न बाळगता सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राकडे …

Read More »

बोरगाव महिला अर्बनला 7 लाखाचा नफा

संस्थापिका सुनिता अण्णासाहेब हवले : 20 वी वार्षिक सभा निपाणी : माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या बोरगाव महिला अर्बन ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक व्यवहाराचे सवय होत आहे. बचतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिला अर्बन पत संस्थेमुळेच महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होत …

Read More »

निपाणीत क्रांती स्तंभाची पूर्ण निर्मिती व्हावी

बहुजन समाजाची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन 1925, 1932, 1936, 1938, 1946 व 1952 सालामध्ये निपाणी नगरीमध्ये सभा झाल्या आहेत. त्यामुळे निपाणी नगरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेने आबेडकर चळवळीचे केंद्र म्हणून संपूर्ण भारतामध्ये निपाणीची ऐतिहासीक नोंद …

Read More »

माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्याकडून सत्कार

कोगनोळी : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एक रकमी 2993 रुपये उच्चांकी दर जाहीर केल्याबद्दल येथील सुतार गल्ली, लोखंडे गल्लीतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कडून माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. विलास लोखंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना माजी …

Read More »

नरेंद्र मांगूरेच्या अष्टपैलू खेळीमुळे साऊथ झोनला विजेतेपद

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कार : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी : निपाणीचा सुपूत्र व बेळगाव जिल्ह्यामधील अष्टपैलू क्रिकेटपटू, सामनावीर व सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी नरेंद्र बाळकृष्ण मांगूरे याने उत्तर प्रदेश येथे झालेल्या बीसीसीआय आयोजित टी -20 अखिल भारतीय दिव्यांगाच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत साऊथ झोन क्रिकेट संघाला विजेतेपद मिळवून …

Read More »

देवचंद महाविद्यालयाने सीमाभागातील मराठी भाषिकांचे हित जपले

शिक्षणमंत्री उदय सामंत : देवचंद महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी : कर्नाटकातील मराठी भाषिक जनतेवर अन्याय होत आला आहे. त्याबाबत शासन नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमाभागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगावजवळील शिनोळी गावात महाराष्ट्र शासनाकडून कौशल्यावर आधारित महाविद्यालयाची लवकरच स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमाभागात असलेल्या देवचंद महाविद्यालयासाठी …

Read More »

ग्रामपंचायतीने केला वर्षाचा पाणीपट्टी घरफाळा रद्द!

अक्कोळ ग्रामपंचायतीचा निर्णय : अतिवृष्टी कोरोनामुळे ग्रामस्थांना दिला दिलासा निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे शिवाय दरवर्षी होणार्‍या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन अक्कोळ येथील ग्रामपंचायतीने बैठक घेऊन वर्षभराचा घरफाळा …

Read More »

जिल्हा पंचायतीचे भिजत घोंगडे, तरीही विधानसभेची तालीम!

पुनर्रचना, आरक्षण रद्द  : नव्या आरक्षणाची प्रतीक्षा निपाणी : येत्या दोन महिन्यात जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना होऊन आरक्षणही जाहीर झाले होते. जाहीर आरक्षणाप्रमाणे निपाणी मतदारसंघात इच्छुकांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली होती. मात्र उच्च न्यायालयाने मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची अधिसूचनाच रद्द केल्याने निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नांवर …

Read More »

एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू नये

शेतकर्‍यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश निपाणी : बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना, जिल्हाधिकारी आणि बेळगाव सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मागील वर्षीची थकबाकी दिल्याशिवाय व यावर्षीची एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असे आदेश दिले …

Read More »