मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार; खुनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी मुलांचे भवितव्य अंधकारमय बनत चालले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय नागरिकांनीही आपल्या मुलांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवून त्यांना …
Read More »ऊसाला प्रतिटन साडेपाच हजार दर द्यावा : राजू पोवार
निपाणीत कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने फिरवल्याने उसाचे उत्पादन घटले आहे. याशिवाय रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने पिकाला खत देणे शक्य झालेले नाही. यावर्षी सर्वच कारखान्यांना उसाची टंचाई भासणार असून खर्चाच्या तुलनेत कारखानदारांना दर द्यावा लागणार आहे. शिवाय कारखाना कार्यस्थळावरील काटा मारीला लगाम बसला आहे. या …
Read More »चांद शिरदवाड ढोल वादन स्पर्धेत हेरवाडचा संघ विजयी
गुर्लापूरचा संघ उपविजेता; कर्नाटक – महाराष्ट्रातील २२ संघाचा सहभाग निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड येथील आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात चांदपीर वालुग मंडळातर्फे आंतरराज्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये हेरवाडचा संतुबाई वालुग मंडळ विजेता ठरला. धनगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली तर मनोज मगदूम, अजित …
Read More »फरार सोयाबीन व्यापाऱ्याच्या शोधासाठी शेतकऱ्यांचे मंडल पोलीस निरीक्षकांना तक्रार अर्ज
निपाणी (वार्ता) : भिवशी येथील सोयाबीन व्यापारी संजय भिमगोंडा पाटील यांनी निपाणी परिसरासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून रक्कम न देताच कुटुंबीयसह बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत मिळावी या मागणीचे तक्रार अर्ज मंडल पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना फसगत झालेल्या बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी …
Read More »साखर कारखान्यावरील वजन काट्यांची रयत संघटनेतर्फे कार्यस्थळावर पडताळणी
निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऊसाच्या गळीत हंगामाच्या काळात अनेक कारखान्याकडून ऊसाची काटामारी होत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांसह रयत संघटनेने साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्यानुसार बैठक होऊन बैठक होऊन सर्वच कारखाना कार्यस्थळावरील स्थळावरील ऊस वजन काट्याची पडताळणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या समवेत …
Read More »बेडकिहाळ येथे २४ पासून आंतरराज्य पुरुष, महिला कब्बडी स्पर्धा; २ लाख ४० हजारांचे बक्षिसे
निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ येथील ग्राम दैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाच्या ऐतिहासिक दसरा महोस्तवानिमित्य गेल्या १० वर्षा पासून बेडकिहाळ – शमनेवाडी दसरा कब्बडी कमिटीच्या वतीने दिवस रात्र भव्य अंतर राज्य पुरुष व महिला कब्बडी स्पर्धेचे आयोजन करून क्रीडा क्षेत्रात एक इतिहास रचले आहेत. कर्नाटक राज्य अम्यच्युअर असोसिएशन व चिकोडी …
Read More »कोगनोळी येथील निरमा पावडर, साबण कारखाना बंद करा
ग्रामस्थांचे निवेदन : आंदोलनचा इशारा कोगनोळी : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मी नगर येथे धुणे धुण्याची पावडर व साबण कारखाना आहे. कारखान्यामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी कारखाना बंद करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत समोर आंदोलन …
Read More »आदिशक्तीच्या जागरात न्हाऊन निघाली निपाणी
श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात परिसरात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गा माता दौंड मध्ये आदिशक्तीच्या जागर सुरू असून त्याला धारकऱ्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी (ता.२०) पहाटे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन संजय साळुंखे व ध्वज आणि शस्त्र पूजन …
Read More »निपाणीत शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून
बाळूमामा नगरातील घटना निपाणी (वार्ता) : शहराबाहेर १४ वर्षीय शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. साकीब समीर पठाण असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. याबाबतची अधिक माहिती अशी की, पठाण हे निपाणी येथे भाडोत्री घरात जुने …
Read More »आप्पाचीवाडी हालसिध्दनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता
कोगनोळी : श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे दिनांक 28 पासून सुरू होणाऱ्या श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त हालसिद्धनाथ मंदिर व परिसर गाड्या पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविक देवदर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करून भाविकांच्या गाड्या, दुकाने, पाळणे इत्यादी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta