संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर शाखा मठाचा दासोह महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे झाली दासोह होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदाच्या दासोह महोत्सवात भक्तांंचा मोठा सहभाग दिसला. परंपरागत पध्दतीने गुडसी वखार येथे श्री दुरदुंडीश्वर उत्सवमूर्तीची गुडशी परिवारातर्फे पूजा करण्यात आली. तदनंतर श्री …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कुमार शौर्य कुलकर्णी, कु.गिरीश केंपदानी यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. त्यांना योग समितीच्या महिला साधकांनी औक्षण करुन भेटवस्तू वस्तू दिल्या. यावेळी योगशिक्षक परशुराम कुरबेट पुष्पराज माने, रावसाहेब करंबळकर, नागराज …
Read More »संकेश्वरात चोरीचा प्रयत्न फसला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोरक्षण माळ येथील सतीश दुंडप्पा शिंत्रे यांच्या घरावर शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १.१० वाजता घराची कौले काढून चोरांनी घरात प्रवेश मिळविला. घरातील लोक जागे झाल्याने चोरांनी आल्या वाटेने पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयी सतीश शिंत्रे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, काल …
Read More »संकेश्वर संतसेना नाभिक समाज अध्यक्षपदी विजय माने, उपाध्यक्षपदी कुमार कदम यांची निवड
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संतसेना नाभिक समाजाची सभा शिवाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी विजय महादेव माने, उपाध्यक्षपदी कुमार केशव कदम, सेक्रेटरी शशीकांत शिंदे, खजिनदार विजय शिंदे बिनविरोध निवडले गेले आहेत. संचालक मंडळात विनोद गंगाधर, सागर शिंदे, शंकर सुर्यवंशी, विशाल …
Read More »युवा वर्गात क्राईमचे भूत….
संकेश्वर (महंमद मोमीन) : चित्रपट, टीव्ही आणि मोबाईलवरील क्राईम स्टोरीचा प्रभाव युवा वर्गात प्रकर्षाने पहावयास मिळत आहे.संकेश्वर भागात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये युवकांचा सहभाग दिसतो आहे. चित्रपटातील क्राईमच्या घटना युवकांना प्रभावित करतांना दिसत आहेत. संकेश्वरात कोणी खुनाच्या आरोपाखाली तर कोणी हाफ मर्डरच्या गुन्ह्याखाली, कोणी अपहरण प्रकरणात कारागृहाची हवा खातांना दिसत आहे. …
Read More »स्वातंत्र्य दिनी नामदेव महिला मंडळाचा शानदार नृत्याविष्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ भूसेनेतील जवान गुरुनाथ गुडशी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंदा बोंगाळे, रुपा काकडे यांनी आझादी का अमृतमहोत्सव सोहळा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. गांधी चौकात नामदेव …
Read More »कु. साई काकडेचे अपहरणकर्ते गजाआड : जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील
अपहरणकर्त्यांकडून तीन बाईक, सहा मोबाईल हस्तगत संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-गोकाक अपराध विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी संकेश्वरातील कु. साई अपहरण प्रकरणाचा केवळ दोन तासांत छडा लावण्याची अभिमानास्पद कामगिरी करुन दाखविल्याचे बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव एम. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान : श्रीमती एम. के. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. महिलांनी स्वतः आरोग्यसंपन्न होण्याबरोबर मुलांना संस्कारसंपन्न बनविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सिध्दीदात्री महिला संघाच्या अध्यक्षा श्रीमती एम. के. पाटील यांनी सांगितले. सिध्दीदात्री महिला संघाच्या उदघाटन समारंभात प्रास्ताविक भाषणात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात उदघाटन …
Read More »बुगटे आलूर ता. हुक्केरी येथे सामूहिक राष्ट्रगीत
हुक्केरी : केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवले होते. या अभियानास बुगटे आलूर वासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. दि. 13 ऑगस्ट रोजी गावातील दत्तमंदिर वरील स्पीकरवरून सकाळी बरोबर 8:00 वाजता राष्ट्रगीत लावण्यात आले. यावेळी सर्व …
Read More »संकेश्वर गोंधळी समाज अध्यक्षपदी दत्ता दवडते, उपाध्यक्षपदी शंकर काळे यांची निवड
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोंधळी समाजाची सभा नुकतीच सुरेश दवडते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत संकेश्वर गोंधळी समाजाचे अध्यक्ष म्हणून दत्ता दवडते, उपाध्यक्षपदी शंकर काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. समाजाच्या ट्रस्टी म्हणून श्रीमती लक्ष्मीबाई गणपती काळे निवडल्या गेल्या आहेत. सेक्रेटरी म्हणून मुरलीधर दवडते, सहसेक्रेटरी रवी तुकाराम दवडते, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta