Sunday , December 7 2025
Breaking News

संकेश्वर

संकेश्वर मराठी मुलांच्या शाळेत विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण विष्णू सुतार यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळा कक्षाचे फित सोडून उद्घाटनन करण्यात आले. प्रोजेक्टर व चार्ट रुमचे उदघाटन एसडीएमसी अध्यक्ष प्रशांत कोपार्डे …

Read More »

एसडीव्हीएस शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिनी शानदार पथसंचलन..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेत एनसीसी छात्रांच्या शानदार पथसंचलनाने आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. एस.डी. हायस्कूल मैदानावर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी ध्वजारोहण केले. महाविद्यालयीन एनसीसी छात्रांनी शानदार पथसंचलन सादर केले. शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

संकेश्वर श्रींनी इतिहास रचला, मठावर झेंडा फडकविला..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी ध्वजारोहण करुन नवा इतिहास रचला आहे. मठाच्या इतिहासात प्रथमच भगव्या ध्वजाबरोबर तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य श्रींनी करुन दाखविले आहे. स्वातंत्रदिनी श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्रींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भक्तगणांनी अभिमानाने राष्ट्रगीत सादर …

Read More »

संकेश्वरात उद्या “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे आयोजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मंगळवार दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च (एमबीए) काॅलेजतर्फे “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. विद्या स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, गेली सात वर्षे झाली “आरंभ” फेस्टने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

संकेश्वरात काॅंग्रेसची भव्य बाईक रॅली…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर घटक काॅंग्रेसच्या वतीने आझादी का अमृतमहोत्सव निमित्त गावातील प्रमुख मार्गे भव्य बाईक रॅली काढण्यात आली‌. बोलो भारत माता की जयच्या जयघोषाना देत बाईक रॅली मार्गाक्रम होताना दिसली. बाईक रॅलीला माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे मार्गदर्शन आणि संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांचे …

Read More »

हर घर तिरंगा अभियानात साई इंटरप्राईजेसचे योगदान

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी येथील साई इंटरप्राईजेसने हर घर तिरंगा अभियानात २५०० तिरंगा ध्वजांची निर्मिती करुन आपला सहभाग दर्शविला आहे. भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा आझादी का अमृतमहोत्सव म्हणून देशभर साजरा केला जात आहे. आझादी का अमृतमहोत्सव सोहळा हर घर तिरंगा फडकावून उत्साही वातावरणात साजरा करण्याचे …

Read More »

संकेश्वरात वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी व्यापारी संकुलातील वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन युवानेते पवन कत्ती यांनी फित सोडून केले. उपस्थितांचे स्वागत वाळके कन्स्ट्रक्शनचे सिव्हील इंजिनिअर ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर सुखदेव वाळके यांनी केले. यावेळी आर. एम. पाटील, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उद्योजक इरण्णा झोंड, रमेश सुर्यवंशी, शंकरराव हेगडे, …

Read More »

संसुध्दी गल्ली वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव

  संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील संसुध्दी गल्लीतील वंदे मातरम् महिला ग्रुपतर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. संसुध्दी गल्लीत ध्वजारोहणांने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सौ. पल्लवी कासारकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, …

Read More »

तिरंगा ध्वज मिळाले नाहीत : विनोद नाईक

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण व्यवस्थित करण्यात आलेली नसल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक विनोद नाईक यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विनोद नाईक म्हणाले, आपल्या प्रभागात ७५४ घरे आहेत.आपल्याला २२० तिरंगा मात्र देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व घरांवर तिरंगा कांहीं फडकविता आला नाही. …

Read More »

संकेश्वर पालिकेत आझादी का अमृतमहोत्सव….

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आले. कोरोना काळात उत्तम सेवा बजाविलेल्या सफाई कामगारांना कर्नाटक सरकारतर्फे देण्यात आलेले प्रमाणपत्र उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सचिन भोपळे, नंदू मुडशी, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, विवेक क्वळी, ॲड. प्रमोद होसमनी यांच्या …

Read More »