संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) अमाप उत्साहात साजरी केली. तरणा पाऊस संततधार बरसत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची नमाज ईदगाह ऐवजी मशीदमध्ये पठण करावी लागली. सुन्नत जमातने ईदची नमाज सकाळी सात वाजता तर मोमीन (मेहदी) समाज बांधवांनी ईदची नमाज सकाळी ८.३० वाजता पठन केली. नमाज …
Read More »संकेश्वरात आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज देवशयनी आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. येथील गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि गोंधळी गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. भक्तगण रांगेत उभे राहून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेवून पुनित होताना दिसले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव …
Read More »दोस्ताने ब्लेडने दोस्तांचा गळा चिरला
चिल्लर पैशांच्या व्यवहारातून प्राणघातक हल्ला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वडर गल्लीत दोस्तांने ब्लेडने दोघा दोस्तांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. ब्लेडने गळा चिरल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे …
Read More »काय शाळा, काय ग्राऊंड….
संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले तालुका हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड-मराठी शाळेची दुरावस्था झालेली दिसत आहे. शाळेतील गळक्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या छतावरील बरीच कौले फुटल्याने पावसाचे पाणी थेट शाळेत प्रवेश करु लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक ठिक-ठिकाणी बादल्या ठेवून त्यावर कसाबसा तोडगा काढण्याचा …
Read More »खनदाळ येथे आषाढीला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा धार्मिक उत्सव
संकेश्वर (महंमद मोमीन) : खनदाळ तालुका गडहिंग्लज येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आषाढीला विविध धार्मिक कार्यक्रमांंचै आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान विश्वस्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या रविवारी १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला निलजी ते खनदाळ श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी प्रवचन, पूजा, …
Read More »बकरी ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा बकरी ईद परंपरागत पद्धतीने शांततेने पार पाडण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित ईदच्या शांतता सभेत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद विषयी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी शांततेच्या …
Read More »हिरण्यकेशीचं गंगा पूजन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज हिरण्यकेशी नदीला आलेल्या नवीन पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले. हिरण्यकेशी स्विमिंग ग्रुपचे सदस्य पुरोहित वामन पुराणिक यांनी हिरण्यकेशी गंगेचे विधिवत पूजन केले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते स्विमिंग ग्रुपला प्रोत्साहन देणारे तमण्णा गाडवी …
Read More »संकेश्वर येथील जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरल्याचे निजलिंगप्पा दड्डी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरीकरणाचे काम करतांना दुभाजक ऐवजी रस्त्याच्या मधोमध कसेबसे पेव्हरचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहने घसरुन येथे अपघात घडत आहेत. सदर रस्ता कामांसाठी …
Read More »संकेश्वरात सरतेशेवटी “आर्द्रा” धो-धो बरसला….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस सरते शेवटी धोधो बरसत निरोप घेताना दिसला. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी (बळीराजा) खूष झालेला दिसला. खरीपाला पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी गेल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पहावयास मिळाला. यंदा शेतकऱ्यांना मृगाने दगा …
Read More »शैक्षणिक साहित्य वाटपाने भरत फुंडे यांचा वाढदिवस साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत सदस्य भरत फुंडे यांचा वाढदिवस सरकारी कन्नड-मराठी शाळेतील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा करण्यात आला. भरत फुंडे यांनी २५० शालेय मुलांना अंकलिपी, कंपास वाटप केले. यावेळी शाळेतर्फे भरत यांचा सन्मान करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना भरत फुंडे म्हणाले, मोठ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta