Sunday , December 7 2025
Breaking News

क्रिडा

राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी

  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. आरआरने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. के एल राहुल आणि …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर १० धावांनी विजय

  नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४३ वा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या …

Read More »

पंजाबचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरचा सर्वात मोठा पराभव

  कोलकाता : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाचा नवा विक्रम रचत पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय साकारला. इडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांची लयलूट झालेल्या लढतीत कोलकाताने २६१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी रचत अशक्यप्राय वाटणारा विजय साकारला. पंजाबने ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून …

Read More »

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग सहा पराभवानंतर नोंदवला दुसरा विजय, हैदराबादवर ३५ धावांनी केली मात

  आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४१ वा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने होते. ज्यामध्ये आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा ३५ धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील आरसीबीचा हा दुसरा विजय, तर सनरायझर्स हैदराबादचा तिसरा पराभव ठरला. आरसीबीने बरोबर एका महिन्यानंतर दुसरा विजय नोंदवला. …

Read More »

दिल्लीचा गुजरातवर ४ धावांनी निसटता विजय

  नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४० वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर ४ धावांनी निसटता विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातसमोर २२५ …

Read More »

मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ

  चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ३९वा सामना एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये लखनऊ सुपरजायंट्सने मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर सीएसकेवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर …

Read More »

यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर राजस्थानचा मुंबईवर ९ विकेट्सने सहज विजय

  राजस्थानने यंदाच्या हंगामात मुंबईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यशस्वीने ६० चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह १०४ धावांची नाबाद खेळी केली. तर गोलंदाजी करताना संदीप शर्माने ४ षटकांत १५ धावा देत ५ विकेट्स घेतले आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. राजस्थानच्या पॉवरप्लेनंतर पावसाने हजेरी लावली. पण यामुळे राजस्थानच्या धावांना …

Read More »

गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय

  आयपीएल २०२४ मधील ३७ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाबचा ३ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १४३ धावांचे लक्ष्य दिले होते, …

Read More »

रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय

  कोलकाता : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३६वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एका धावेनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने श्रेयस अय्यरचा अर्धशतकी खेळीच्या जोरावर …

Read More »

हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी

  विक्रमी खेळीसह सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ऑल आऊट करत ६७ धावांनी विजय मोठा विजय मिळवला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या पॉवरप्लेमधील सर्वाधिक १२५ धावांच्या खेळीसह सनरायझर्स हैदराबादने २६७ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या फलंदाजांनीही हे लक्ष्य गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे संघाला या धावसंख्येचा यशस्वी …

Read More »