Tuesday , March 3 2026
Breaking News

क्रिडा

पाकिस्तान हरले! अफगाणिस्तानचा आणखी एक सनसनाटी विजय

  चेन्नई : चेन्नई येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने आणखी एक उलटफेर केला आहे. अफगाणिस्तान संघाने अफगाणिस्तानचा आठ विकेटने पराभव केला. पाकिस्तानला 283 धावांत रोखल्यानंतर हे आव्हान 49 व्या षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. अफगाणिस्तान संघाने याआधी गतविजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केला होता. 284 धावांच्या धावांचा बचाव करताना …

Read More »

माजी कर्णधार बिशनसिंह बेदी यांचं निधन

  नवी दिल्ली : भारतामध्ये विश्वचषक सुरु असतानाच क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंह बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. 1966 ते 1979 पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. …

Read More »

२० वर्षांचा ‘दुष्काळ’ संपला! न्यूझीलंडला पराभवाचा ‘पंच’ मारून टीम इंडिया ‘टेबल टॉपर’

  धरमशाळा : डॅरेल मिचेलचे शतक (१३०) आणि राचिन रविंद्रचे अर्धशतक (७५) यांच्या बळावर न्यूझीलंडने भारताला २७४ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ‘चेसमास्टर’ विराट कोहलीने लौकिकाला साजेसा खेळ केला. शेवटपर्यंत पिचवर तळ ठोकून विराटने भारताला यंदाच्या विश्वचषकात सलग पाचवा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने विश्वचषकातील न्यूझीलंडविरूद्धचा विजयाचा …

Read More »

भारताचा विजयी ‘चौकार’; बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

  पुणे : शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने ठोकलेला शानदार षटकार आणि केलेल्या शतकी खेळीने संघाला ‘विराट’ विजय मिळवून देत विजयाचा ‘चौकार’ साजरा केला. त्याला शुभमन गिलची अर्धशतकी खेळी तर हिटमॅनची तडाखेबाज फलंदाजीने साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून बांगला देशला 256 धावांत रोखल्यानंतर विराट कोहली (103*), शुभमन गिल (53) …

Read More »

विश्वविजेत्या साहेबांना अफगाणिस्तानने धुळ चारली

  नवी दिल्ली  : विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी आज अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या …

Read More »

हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटने चिरडले

  अहमदाबाद : अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने सहज पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला १९१ धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर १९२ धावांचे आव्हान ३०.३ षटकात ७ विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने ८६ धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर …

Read More »

विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर

  नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून धुव्वा उडवला. भारताचा हा विश्वचषकातील सलग दुसरा विजय होय. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या विजयाचे हिरो ठरले. भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत पाकिस्तानला मागे …

Read More »

भारताचा अफगाणिस्तानवर 8 विकेटने विजय

  नवी दिल्ली : रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट आणि 15 षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले 273 धावांचे आव्हान भारताने दोन विकेट आणि 35 षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव …

Read More »

डेंग्यूला हरवले; शुभमन गिल आज अहमदाबादला रवाना होणार

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल याच्या प्रकृतीमध्ये सुधारणार आहे. शुभमन गिल आज अहमदाबादला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. भारतीय संघ चेन्नईतून दिल्लीत शुभमन शिवाय दाखल झाला. …

Read More »

विराट-राहुलची जिगरबाज खेळी! भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गड्यांनी विजय

  चेन्नई : विराट कोहली (115 चेंडूत 85) आणि केएल राहुल (115 चेंडूत नाबाद 97) यांच्या झुंझार खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कांगारूंच्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न …

Read More »