बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय …
Read More »भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश
पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 30 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे …
Read More »भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का! नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर
नवी दिल्ली : बर्मिंगहममध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी बर्याचदा चांगली …
Read More »अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी
पोर्ट ऑफ स्पेन : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार असा विजय मिळवला आहे. यावेळी वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने दोन गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच …
Read More »नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला! जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक ऍथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं. नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं …
Read More »रोमहर्षक सामन्यात भारताचा विंडीजवर 3 धावांची विजय
पोर्ट ऑफ स्पेन : रोमारिओ शेफर्डने अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात विंडीजने चांगला खेळ केला. शिखर धवन, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर भारत ४००च्या आसपास धावा करेल असे चित्र दिसत होते, परंतु अखेरच्या १५ षटकांत विंडीज गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. …
Read More »नीरज चोप्रा पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
नवी दिल्ली : वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दमदार कामगिरी करून दाखवलीय. अमेरिकेत सुरू असलेल्या या चॅम्पियनशिपच्या गट फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं 88.39 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत धडक दिलीय. महत्वाचं म्हणजे, कोणताही खेळाडू त्याच्यापेक्षा जास्त अंतर कापू शकला नाही. पहिल्यादांच नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये …
Read More »चहावाल्याच्या लेकीला रौप्य; कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने देशाला पदक जिंकून दिले
मुंबई : अपंग चहा विक्रेत्याची मुलगी असलेल्या निकिता कमलाकरने आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. पुण्याच्या हर्षदा गरुडने सोमवारी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या निकिताने मंगळवारी रुपेरी यश मिळवले. निकिता ताश्कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ५५ किलो गटात स्नॅचमध्ये ६८ किलो वजनच पेलू शकली. त्यामुळे तिला या …
Read More »इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
लंडन : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी …
Read More »भारताची एकदिवसीय क्रमवारीत तिसर्या स्थानावर भक्कम पकड
नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम केले असून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसर्या स्थानावर पकड भक्कम झाली आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी भारताला मागे टाकणे कठीण असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून …
Read More »