Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

श्री दुर्गा माता दौडीतून नारीचा शक्तीचा संदेश!

  बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेळगावात अखंड श्री दुर्गा मातादौडचे २६ वे वर्ष पार पडले. आज ९ व्या दिवशी श्री दुर्गा माता दौडीला बेळगाव शहरातील ताशिलदार गल्ली, श्री सोमनाथ मंदिर येथून श्री सिद्धिदात्रीच्या पूजेसह प्रदक्षिणा घालण्यात आली. श्री दुर्गामाता दौड …

Read More »

कडोली साहित्य संमेलन ५ जानेवारीला

कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे ४० वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भरमाणी डोंगरे होते. बैठकीत 40 व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. संमेलनातील विविध सत्रे, साहित्यिक, पाहूणे …

Read More »

प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना अटक : सात लाखाचे दागिने जप्त

  बेळगांव : प्रवाशांना लुटून सोने पळविणाऱ्या आरोपींना अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार रिजवान सिराज पठाण (वय ४०, विद्यानगर, एपीएमसी, बेळगाव), मलिकजान दस्तगीरसाब शेख (वय २६, मूळचा गोकाक सध्या राहणार एपीएमसी) आणि विनायक अरुण हिंडलगेकर (वय ३२, सध्या राहणार जुने गांधीनगर) …

Read More »

सिद्धरामय्या कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात : विजयेंद्र

  बेळगाव : सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि याबाबतचे सत्य लवकरच समोर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयेंद्र म्हणाले की, हरियाणातील जनतेने मोदींच्या हमीभावावर विश्वास ठेवून काँग्रेसला नाकारले आहे. हा विजय महाराष्ट्राच्या निवडणुकीतही भाजपचा वरचष्मा ठरेल, असा विश्वास विजयेंद्र यांनी व्यक्त केला. जम्मूमध्ये भाजपचा …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले दुर्गा देवीचे पूजन

  बेळगांव : बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात सहभागी होऊन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी देवीचे पूजन केले. महाप्रसादाचे वाटप केले. बेळगुंदी येथे दुर्गादेवी उत्सवात तालुका समिती युवा आघाडीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त समितीच्या नूतन पदाधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होत. समितीचे कार्याध्यक्ष संतोष मंडलिक आणि खजिनदार मल्लाप्पा पाटील यांच्या …

Read More »

हिप्परगी जलाशयाच्या गेटवर तांत्रिक बिघाड! पाण्यामुळे गेट बंद करण्यात मोठी अडचण

  बेळगाव : सीमावासीयांची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णाला आता पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्याचे कारण म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे बांधण्यात आलेल्या हिप्परगी बॅरेजमध्ये आता तांत्रिक बिघाड झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. अथणी तालुक्यातील हिप्परगी बॅरेजचे 21 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता केवळ सातवा दरवाजा …

Read More »

२० वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ५ जानेवारी रोजी

  मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक नुकतीच साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये प्रारंभी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

भर पावसात श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित आठव्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात ध. संभाजी महाराज चौक येथून झाली. यावेळी ध. संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर ध्वज चढविण्यात आला. नंतर प्रेरणा मंत्र म्हणून भर पावसात दौडीला प्रारंभ झाला. त्यानंतर ही दौड बसवान गल्ली, गणपती गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे …

Read More »

आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज बेळगावमधील विविध वसतिगृहांना भेट देऊन पाहणी केली. रामतीर्थ नगर येथील श्री डी देवराज अरसु मुलांचे वसतिगृह, अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह, डॉ. बी. आर. आंबेडकर सरकारी वसतिगृह, एस. टी मुलांचे वसतिगृह आदी वसतिगृहांना भेट देऊन तेथील एकंदर …

Read More »

बेळगावात दुर्गामाता दौडीचा सातवा दिवस उत्साहात

  बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत बेळगावात यावेळेसही श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २६ व्या वर्षीची अखंड श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येत आहे. नवरात्रीच्या 7 व्या दिवशी नेहरू नगर येथील बसवन मंदिर येथून भद्रकाली अवताराच्या पूजनाने श्री दुर्गामाता दौडचा प्रारंभ झाला. श्री दुर्गामाता दौडची सुरुवात …

Read More »