Monday , April 20 2026
Breaking News

महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती धर्मवीर संभाजी सर्कलमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व आमदार अभय पाटील व महापौर आणि उपमहापौरनै टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. याचा निषेध व्यक्त करीत आज कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्याची महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
आज महापालिकेसमोर कन्नड संघटनांचे कार्यकर्ते महापौर आणि उपमहापौरांचाही निषेध जाण्यासाठी जमले होते. कर्नाटक सरकारच्या अनुदानातून पुतळा उभारण्यास आणि बसविण्यास परवानगी देण्यात आली, आता उद्घाटनावेळी कन्नड भूमीचा अवमान करण्यात आला. यावेळी उपस्थित आमदारांनी, महापौर आणि उपमहापौरांनी टाळ्या वाजवल्या. आमदार अभय पाटील यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी महापौर व उपमहापौर यांना महापालिका प्रशासनातून बडतर्फ करावे, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असा इशारा कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी महापालिकेत घुसू पाहणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *