Monday , September 21 2026
Breaking News

हुतात्मा दिन गांभीयनि पाळण्याचा खानापूर म. ए. समितीचा निर्धार!

Spread the love

 

‘मध्यवर्ती’ च्या उपक्रमांत सक्रिय सहभागाचे आवाहन

खानापूर : हुतात्मा दिनी १७ जानेवारी खानापुरातील हुतात्मा स्मारकात सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ९) शिवस्मारकात ही बैठक झाली.

सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. १७ जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाज संघटनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात आंदोलन करुन १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविण्यात आला. नव्या सरकारने त्वरित सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी. सर्वोच्च न्यायालयातील खटल्याला गती द्यावी. महाराष्ट्रातील नेते सीमाभाग केंद्रशासित करावा अशी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याशी विसंगत भूमिका घेत आहेत. त्यामुळे, सीमालढ्याला व दाव्याला बाधा पोचू शकते. याबाबत महाराष्ट्र सरकार व विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा तारा भवाळकर यांची सांगलीत भेट घेऊन साहित्य संमेलनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा ठराव संमत करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले. बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, मारुती परमेकर, संजीव पाटील, अजित पाटील, देवाप्पा भोसले, अनंत पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, नागेश भोसले, जगन्नाथ बिर्जे, अभिजीत सरदेसाई, राजाराम देसाई, शंकर गावडा, रुक्माण्णा झुंजवाडकर, रमेश धबाले यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

पीएलडी बँक संचालकांचा सत्कार

पीएलडी बँकेच्या अध्यक्षपदी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आणि लक्ष्मण कसर्लेकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संचालक म्हणून श्री. नारायण नागाप्पा पाटील, श्री. विरुपाक्ष महादेव पाटील, श्री. शंकर सडेकर, श्री. सुभाष निंगाप्पा गुरव, श्री. सुनील चोपडे, श्री. कुतुबुद्दीन बिचनावर, श्री. यमनप्पा राठोड, सौ. लक्ष्मी शिवाप्पा पाटील, सौ. सुलभा धनाजी आंबेवाडकर या मराठी भाषिकांची भूविकास बँकेच्या संचालक पदी संचालक पदी निवड झाल्याबद्दल खानापूर समितीतर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *