बेळगाव : ओमानमध्ये कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गोकाक येथील आई, मुलगा, मुलगी आणि जावई या चार जणांचा मृत्यू झाला. गोकाक येथील विजया मायाप्पा तहसीलदार (52), पवनकुमार मायाप्पा तहसीलदार (22), पूजा आदिशा उप्पार (21) आणि अदिशे बसवराज उप्पार (32) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मूळचे गोकाकचे …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांनी केले श्रमदानातून येळ्ळूर रस्त्याचे डागडुजीकरण
बेळगाव : आज दिनांक 30-08-2024 रोजी सामाजिक भान ठेवत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्रमदानातून येळ्ळूर रस्त्याचे डागडुजीकरण करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून येळ्ळूर रस्त्याची मोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना वाहन चालवणे आता खूपच कठीण झाले आहे. कारण रस्त्याची पातळी समतोल नसल्यामुळे या मार्गावरून वाहन नेताना दुचाकी …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या सहकारी शिक्षिका जयश्री पाटील या उपस्थित होत्या. यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा प्रमुख पाहुण्या जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त …
Read More »बलिष्ठ आणि सदृढ समाज निर्मितीसाठी अध्यात्माची पाळेमुळे समाजात खोलवर रुजविणे गरजेचे : श्री मंजुनाथ स्वामीजी
बेळगाव : सांस्कृतिक वारसा असणाऱ्या बेळगाव नगरीला आध्यत्मिक नगरी बनवू. मात्र, यासाठी आपल्याला बेळगावकरांची साथ हवी, असे बेंगळुर येथील गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी म्हणाले. सकल मराठा समाजाच्यावतीने हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात स्वामीजींनी उपरोक्त विचार व्यक्त केले. संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली …
Read More »कित्तूर नगरपंचायत सदस्याचे अपहरण!
कित्तूर : कित्तूर नगरपंचायत सदस्याचे रात्री अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. कित्तूर नगरपंचायतीचे भाजप सदस्य नागेश असुंडी हे शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौकीमठ क्रॉसजवळ उभे असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. येत्या ३ सप्टेंबर रोजी कित्तूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एकूण २० सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे तर …
Read More »शरद पवार 2 सप्टेंबर रोजी बेळगावात; कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार
बेळगाव : कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समारंभाच्या तयारीसाठी आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे स्वागत समितीची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळाराम पाटील हे होते. बैठकीच्या सुरुवातीस श्री. नितीन आनंदाचे यांनी गेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. …
Read More »रेणुकास्वामी खून प्रकरणः आरोपी प्रदोष हिंडलगा कारागृहात
बेळगाव : रेणुकास्वामी खून प्रकरणातील A14 आरोपी प्रदोषला बेंगळुरू येथून बेळगाव हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. या हत्याकांडातील १४ वा आरोपी प्रदोष कारागृहात ब्लँकेट आणि बॅग घेऊन आला असता, या बॅगेत सिरप ही आढळून आले. दोन बॅगमधील कपडे आणि साहित्य तपासल्यानंतर हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी प्रदोषला आत सोडले.
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी मनोहर किणेकर यांची निवड
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी निवडण्यासंदर्भात आज कार्यकारिणी सदस्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली व नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याकडे सर्वांनुमते सोपविण्यात आली. नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे अध्यक्ष : मनोहर किणेकर. कार्याध्यक्ष : आर. …
Read More »गणेश चतुर्थी आणि ईद-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : श्रीगणेश चतुर्थी आणि ईद-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आगामी उत्सव काळात घ्यावयाच्या खबर्दारीसंदर्भात सूचना देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीत शांतता व सुव्यवस्था राखणे तसेच जनतेच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. एडीजीपी आर. हितेंद्र यांनी, सण कसे साजरे केले पाहिजेत, …
Read More »ग्रामीण विकास योजनेतून अनेक कार्यक्रम
बेळगाव : धर्मस्थळ धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास योजनेंतर्गत अनेक कार्यक्रम करत असल्याचे ज्येष्ठ वकील जी. आर. सोनेर यांनी सांगितले. हिंडलगा गणेश सभाभवन येथे श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पाच्या स्वयंअर्थसहाय्यित संस्थांतर्फे सामूहिक श्रीवरमहालक्ष्मी पूजन व पदग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रावण महिन्यात वरमहालक्ष्मीची सामुहिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta