Monday , April 20 2026
Breaking News

खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या हस्ते शनिवारी विविध विकास कामाचा प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एससीपीटीएसपी फंडातून निपाणी मतदारसंघातील १२ गावांना रस्ता कामांसाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून होणाऱ्या कामांचा प्रारंभ (ता.७) शनिवारी होणार आहे. यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी या उपस्थित असणार आहेत.
या निधीतून १२ गावांमधील मागासवर्गीय कॉलनीमध्ये सीसी रस्ताकामे केली जाणार आहेत. सकाळी ११ वाजता तवंदी, १२ वाजता यरनाळ, १२.३० वाजता शिरगुप्पी, १.३० वाजता हदनाळ, २ वाजता सुळगाव, २.३० वाजता कोगनोळी, ३.३० वाजता कुन्नूर, ४.३० वाजता बेनाडी, ५ वाजता सौंदलगा, ५.३० वाजता भिवशी, ६.३० वाजता हुन्नरगी आणि सायंकाळी ७. ३० वाजता बेडकिहाळ येथे रस्ताकामांचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक किरण रजपूत, खासदारांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग रंगसुभे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *