बेळगाव : बिजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात औषध फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विविध साथींचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली आहे. बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, व यळेबैल गाव परिसरात गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत …
Read More »मुसळधार पावसामुळे बेळगावमधील ऐतिहासिक विहीर कोसळली
बेळगाव : मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील ऐतिहासिक विहीर, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली. हि विहीर अत्यंत जुनी असून चार घडघडे असणारी हि विहीर आजवर कधीच आटली नव्हती. संपूर्ण उन्हाळाभर या विहिरीतून पाणीपुरवठा व्हायचा. पण मुसळधार पावसामुळे अचानक हि विहीर कोसळली असून यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात …
Read More »मराठा सेवा संघ बेळगांवतर्फे ७ रोजी ‘माईंड पॉवर’वर परिसंवाद
बेळगाव : मागील महिन्यात कोल्हापूर येथील प्रसिद्ध माईंड ट्रेनर आणि मोटिवेशन स्पीकर शिवश्री विनोद कुराडे यांचे बेळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन बेळगाव व येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याला मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या पालकांच्या आग्रहास्तव विनोद …
Read More »इंगळी पीकेपीएस अध्यक्षपदी सुनील पाटोळे
अंकली : इंगळीतील बहुद्देशीय प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सुनील पाटोळे तर उपाध्यक्षपदी बिबाताई शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजाराम माने यांनी प्रास्तविक केले. संचालक मंडळ आणि संस्थेतर्फे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटोळे यांनी सर्वांच्या सहकायनि संघासह …
Read More »जायन्टस ग्रुप ऑफ बेलगाम परिवारतर्फे प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट भिडे यांचा सन्मान!
बेळगाव : जायन्टस ग्रुप ऑफ बेलगाम परिवारतर्फे चार्टर्ड अकाउंटंट दिनाच्या निमित्त टिळकवाडी बेळगांव येथील प्रसिद्ध अकाउंटंट श्री. सुनील महादेव भिडे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य सुनील भिडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध चार्टड अकाउंटंट सुनील भिडे हे आपल्या चिरंजीव आदित्य भिडे यांना चार्टड अकाउंटंट बनवलं आहे तसेच बेळगावतील इतर तरुणांना …
Read More »राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळी कवी संमेलन संपन्न
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 3 जुलै रोजी आयोजित बेळगाव परिसरातील माध्यमिक शाळेतील मुलांसाठी पावसाळी कवी संमेलन संपन्न झाले. या पावसाळी कवी संमेलनात बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. या कवी संमेलनात …
Read More »गोकाक येथे 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू : पालकांचा डॉक्टरांविरोधात संताप
गोकाक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयातील उपकरणे फोडल्याची घटना गोकाक येथील ब्याळीकाटाजवळील कडाडी रुग्णालयात घडली. डॉ. महांतेश कडाडी यांचे खाजगी रुग्णालय असून, शिवानंद निंगाप्पा बडबडी यांच्या 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील साहित्याची नासधूस केली. आजारी असल्याने चार दिवसांपूर्वी मुलाला रुग्णालयात दाखल …
Read More »राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी : अनिल बेनके
बेळगाव : राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुविरोधी वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी लोकसभेत हिंदूंची माफी मागावी, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हिंदू हिंसाचारी आणि दहशतवादी असल्याचे वक्तव्य …
Read More »महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली शहरातील स्वच्छतेची पाहणी
बेळगाव : बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहराला भेट देऊन सफाई कामगारांचे काम व स्वच्छतेचे निरीक्षण केले. सकाळी 6.00 च्या सुमारास सदाशिवनगर येथील महापालिकेच्या वाहन शाखेला भेट दिली. नंतर त्यांनी कचरावाहू वाहनास भेट देऊन कामगारांच्या कामाची व स्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर महांतेश नगर येथील बीट कार्यालय व वीरभद्रनगर …
Read More »बाची येथे घरावर झाड कोसळून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंगळवारी रात्री विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्यातील बाची येथील श्रीमती शांता परशराम गावडे आणि मोहन परशराम गावडे यांचा घरावर वृक्ष कोसळून 5 लाखाचे नुकसान झालेले आहे. तरी प्रशासनाने ताबडतोब या घडलेल्या घटनेकडे पाहून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta