Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव

आजारी वडिलांना रुग्णालयात सोडून मुलाचे पलायन; उपचाराविना वडिलांचा मृत्यू

  बेळगाव : आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांना रुग्णालयातून सोडून पलायन केल्याची घटना बेळगावात घडली आहे. उपाचाराविना दुर्दैवी वडिलांचा मृत्यू झाला. आजारी असलेल्या सतीश्वर नामक व्यक्तीला काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने उपचारासाठी बिम्स रुग्णालयात दाखल केले होते. दहा दिवसांपूर्वी वडिलांना रुग्णालयातच सोडून तो अचानक पळून गेला. मुलगा येईल या आशेने जीव मुठीत …

Read More »

शहापूर येथे पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने लाखोंचे नुकसान…

  बेळगाव : कालच्या मुसळधार उपनगरे जलमय झाली होती. शहापूर येथील एका टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. शहापूर-गणेशपुर गल्ली येथील शिल्पा मगावी यांच्या मालकीच्या टेलरिंग दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने टेलरिंग दुकानातील साहित्य, महागड्या सिल्क साड्या आणि लग्नाचे कपडे खराब झाले. यामुळे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान …

Read More »

आमचा गट भाजपातच राहील : आम. रमेश जारकीहोळी

  बेळगाव : आमचा गट भाजपमध्येच कायम राहील, यत्नाळ यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिला असला तरी यात तथ्य नसून आम्ही सर्वजण भाजपमध्येच कार्यरत राहू असा विश्वास गोकाकचे आमदार, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी …

Read More »

शहापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा लवकरच जिर्णोध्दार

  मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : शहापूर बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिर येथे शहापूर परिसरातील विविध गल्ल्यातील पंचमंडळी महिला युवक ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात …

Read More »

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात सिंहिणीचे आगमन

  बेळगाव : बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून बेळगावच्या कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात एका सिंहिणीला आणण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी रोजी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात निरुपमा नावाच्या सिंहिणीचा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे कृष्ण नावाचा सिंह एकाकी पडला. काल रविवारी बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून या सिंहिणीला भुतरामनहट्टीची येथील  प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बुधवारी बैठक

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किनेकर माजी आमदार यांनी केले आहे.

Read More »

ज्योतिर्लिंग देवस्थान बेळगाव येथे 3 एप्रिल रोजी कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी जोतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जोतिबाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तसेच केदार ग्रंथाचे पठण करण्यात येणार असून बारा वाजता आरती करून तीर्थप्रसाद वाटप होणार आहे.त्यानंतर जोतिबा देवाचा जप करण्यात येणार …

Read More »

बेळगाव साहित्य संमेलनात शाहिर अभिजित कालेकर यांचा ‘जागर लोक संस्कृतीचा’ कार्यक्रम रंगणार

  बेळगाव : ६वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरांच्या जतनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. या संमेलनात शाहीर अभिजीत कालेकर लिखित ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून, तो रसिकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. लोक संस्कृती नाट्य कला संस्था, खानापूर-बेळगाव …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागात विकासाचा नवा अध्याय : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गत रस्ते, शाळा, समाजभवन आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील धामणे (एस) येथील सरकारी मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या दोन अतिरिक्त …

Read More »

बेळगाव शहर परिसरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी

  बेळगाव : आज सोमवारी देशभरात ईद साजरी केली जात असून बेळगावमधील मुस्लिम बांधवांकडून देखील रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला गेला. त्या अनुषंगाने आज सकाळी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रमही पार पडला. रमजान ईद निमित्त आज पहाटेपासूनच शहर उपनगरातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचे नमाज पठण करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील …

Read More »