Friday , April 17 2026
Breaking News

बॅ. नाथ चौक श्रींच्या मंडपात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय

Spread the love

 

बेळगाव : शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत सोमवारी सायंकाळी श्रींच्या मंडपात, खासबाग येथील क्रांती महिला मंडळाच्या भगिनींनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय बनविले.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बॅरिस्टर नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात क्रांती महिला मंडळाच्या शारदा भेकणे, मंदा माळवी, कल्पना पवार, कविता पवार, रुक्मिणी पाटील, लता माळवी, उज्वला नाकाडी, संगीता पठाडे, सविता बिर्जे, सुनीता मालवणकर व अन्य भगिनींनी सुरेल स्वरात अथर्वशीर्ष पठण करुन वातावरण चैतन्यमर आणि मंगलमय बनविले. अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला परिसरातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यावेळी क्रांती महिला मंडळाच्या ज्येष्ठ भगिनी मंदा माळवी यांचा भारती विजय सामजी यांच्या हस्ते शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, श्री काळभैरव मंदिर देवस्थानचे ट्रस्टी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरती नंतर प्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला. दरम्यान उद्या बुधवारी श्रींच्या आरतीनंतर भारत नगर शहापूर येथील श्री भक्ती महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *