Sunday , July 26 2026
Breaking News

संत मीरा शाळेला तिहेरी मुकुट; बालिका आदर्शही विजेता

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला तर बालिका आदर्श शाळेने विजेतेपद पटकाविले.
प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने लिटल स्कॉलर शाळेचा 7-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या पूर्वी बडमंजीने 3, प्रणिता बडमंजीने दोन गोल, अमृता बजंत्रीने 1 ईश्वरी कुलकर्णीने 1 गोल केला.
मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंटपॉल शाळेचा 6–0 पराभव करित विजेतेपद पटकाविले.
विजयी संघाच्या उत्कर्ष कणसेने हॅट्रिकसह 4 गोल, तर फरार नदाफने दोन गोल केले.

माध्यमिक मुलींच्या गटातील पहिल्या अंतिम सामन्यात सामन्यात बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 8-0 असा असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघाच्या शिवानी शेलारने चार गोल, ऋतुजाने दोन तर श्रद्धा व समृद्धीने प्रत्येकी एक गोल केले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 4-0 असा पराभव केला. विजयी संघाच्या सोहेल विजापूरने दोन गोल, अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर यांनी प्रत्येकी एक गोल केले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती राज्यसचिव अशोक शिंत्रे, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, स्पर्धा सचिव चंद्रकांत पाटील, गेगरी मेंडीस, उमेश बेळगुंदकर, चेस्टर रोजारियो,
या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच जयसिंग धनाजी, ज्युलेट फर्नांडिस, उमेश मजुकर, शिवकुमार सुतार, देवेंद्र कुडची, मारुती मगदूम, संजय केळगिरे, अनिल जनगौडा, महावीर जनगौडा शिला सानिकोप, रामलिंग परीट, यश पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *