Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात 5 रोजी जिल्हास्तरीय ‘जय गणेश श्री -2025’ शरीरसौष्ठव स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेतर्फे येत्या शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जय गणेश श्री -2025’ किताबाच्या पहिल्या जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे भरविली जाणारी ही शरीरसौष्ठव स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलो वरील गट अशा सात वजनी गटात घेतली जाणार आहे. स्पर्धेतील टायटल विजेत्या स्पर्धकास 11000 रुपये आणि बेस्ट पोझर किताब विजेत्यास 3000 रुपयांसह पदकं, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू आणि सॅश बेल्ट बक्षीसा दाखल प्रदान केला जाईल. या व्यतिरिक्त प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 2500, 2000, 1800, 1500, 1200 रुपयांची बक्षिसे दिली जातील. रामनाथ मंगल कार्यालय येथे स्पर्धेला ठीक 6 वाजता प्रारंभ होईल, मात्र तत्पूर्वी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत स्पर्धकांची वजन नोंदणी केली जाईल. तरी सदर स्पर्धेसाठी प्रवेश मोफत असून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शरीर सौष्ठवपटूंनी अधिक माहितीसाठी विजय चौगुले (9964780696), चेतन ताशिलदार (7829957283), राजेश लोहार (8971597642) किंवा नागेंद्र मडिवाळ (9035134605) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *