Thursday , December 18 2025
Breaking News

बेळगाव

रिंगरोड विरोधातील शेतकऱ्यांची सोमवारी बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोडला बेळगाव शेतकऱ्यांनी न्यायालयीन स्थगिती घेतली आहे. यामुळे या स्थगिती संदर्भात व रिंगरोड रद्द करण्यासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कॉलेज रोड (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात सोमवार दिनांक २ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना रिंगरोड …

Read More »

उचगाव क्रॉस ते कोवाड रस्त्याची दयनीय अवस्था; कागणी युवा वर्गाकडून भीक मागो आंदोलन!

  बेळगाव : उचगाव क्रॉस ते कोवाड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता सीमा हद्दीत असल्यामुळे प्रशासनाचे या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम खात्याने या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनीच आता चक्क भिक माग …

Read More »

…तब्बल 30 तास यंदाची विसर्जन मिरवणूक!

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर” या अशा जयघोषात पारंपारिक ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास चालली. गुरुवारी सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. हुतात्मा चौकात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती ती …

Read More »

कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

  बेळगाव : आज शुक्रवार दि. २९ व शनिवार दि. ३० रोजी बेळगाव जिल्ह्यावरील ढगांवर रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यास सुरुवात झाली. बेळगाव सांबरा विमानतळ येथे बेळगाव शुगर्सच्या माध्यमातून या प्रयोगाला चालना देण्यात आली. बेळगाव शुगर्सला नागरी विमान उड्डयन निर्देशालयाच्या महासंचालकांच्या कार्यालयाने जिल्हातील ढगांवर रसायनांची फवारणी …

Read More »

गणरायाला भक्तिभावाने निरोप!

  बेळगाव : अकरा दिवस विराजमान झालेले गणराज आज भक्तांचा निरोप घेऊन जात आहेत. शहरात विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेत सुरू झाली. कावेरी कोल्ड्रिंक जवळ मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, आमदार असिफ सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, …

Read More »

बेळगावात उद्यापासून क्लाऊड सीडींग

  बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मालकीच्या बेळगाव शुगर्सच्या वतीने पावसासाठी बेळगाव जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी क्लाउड सीडिंग (ढगांवर फवारणी) काम करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने (DGCA) बेळगाव शुगर्सच्या वतीने 29 आणि 30 सप्टेंबर …

Read More »

गणरायाच्या निरोपासाठी बेळगावनगरी सज्ज; कडेकोट बंदोबस्त

  बेळगाव : लाखो भाविकांना उत्साह देणाऱ्या यंदाच्या सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळासह जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीचे नेटके नियोजन केले आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी चार वाजता हुतात्मा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतरची मोठी आणि आकर्षक असणारी विसर्जन मिरवणूक …

Read More »

घरची जबाबदारी घेताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : घरची संपूर्ण जबाबदारी घेताना महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये; मनाला प्रसन्न करणाऱ्या सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथिक फिजिशियन, लेखिका डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा लेखिका संघातर्फे कन्नड साहित्य भवन येथे आयोजित धर्मादाय कार्यक्रमात ते बोलत …

Read More »

कित्तूर उत्सवासाठी 5 कोटी अनुदानाचा प्रस्ताव : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  कुस्ती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव : कित्तूर उत्सव हा राज्यस्तरीय उत्सव असल्याची घोषणा करून राज्य सरकारने गेल्या वर्षी 2 कोटी रुपये अनुदान दिले होते. यंदा या उत्सवासाठी 5 कोटी अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी …

Read More »

उद्या वाहतूक मार्गात होणार बदल!

  बेळगाव (वार्ता) : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने शहराच्या कांही वाहतूक मार्गात बदल केले असून त्याची अंमलबजावणी उद्या गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून विसर्जन संपेपर्यंत केली जाणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला उद्या गुरुवारी शहरातील नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ होणार …

Read More »