Thursday , December 18 2025
Breaking News

बेळगाव

महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

  बेळगाव : अनंत चतुर्दशी जवळ आल्याने बेळगाव महापालिकेने विसर्जन मिरवणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची पायी फिरून पाहणी केली आणि सर्व समस्या सोडवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज, रविवारी आधी कपिलतीर्थ येथील …

Read More »

आंबेवाडीतील मुलांच्या खो-खो संघाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणमधील आंबेवाडी गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. रामदुर्ग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील व सागर सुतार यांनी खो-खो संघाला प्रोत्साहनात्मक म्हणून टी-शर्ट, पॅन्ट व जर्सी दिले तर बेळगाव ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

समर्थ नगर येथील एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन

  बेळगाव : बेळगावचा एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने “कुंभकर्ण सारखा निद्रा अवस्थेत असलेले आपला हिंदु बांधव” ह्या देखाव्याचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडूसकर व डॉक्टर रवि पाटील यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. …

Read More »

रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघांना अटक

  बेळगाव : रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघा जणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 16 फिश प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. आरपीएफचे निरीक्षक एस. आर. कारेकर, उपनिरीक्षक हर्षराज मीना व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली …

Read More »

बार कामगाराचा गळा चिरून खून; घटप्रभा येथील घटना

  बेळगाव : शनिवारी सुटी असताना बार कामगारांमध्ये भांडण होऊन गळा कापून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याची घटना काल रात्री घटप्रभा येथे घडली. संजू हा घटप्रभा येथील एका बारमध्ये गेल्या एक महिन्यापासून काम करत होता. काल बारला सुट्टी होती. काही कारणावरून रात्री कामगारांमध्ये भांडण झाले. त्यामुळे अनर्थ घडला. त्यातील तिघांनी एकत्र …

Read More »

अनोख्या पद्धतीने मंगळा गौर कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : शहापूर बेळगाव येथे मंगळागौरी पूजन आणि गणेशोत्सव चा विविध कार्यक्रमाने ग्रंथ हेच गुरु आणि वाचनाचे महत्त्व वाचाल तर वाचाल अशा आशयाला धरून मंगळागौरी पूजन करण्यात आले.अखिल भारतीय प्रगतीशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध भाषांमधील विविध …

Read More »

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखाना काकती या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. काकती येथील कारखाना कार्यस्थळावर सकाळी ठीक ११.०० वाजता या सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे. तरी या सर्वसाधारण सभेसाठी कारखान्याच्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी, हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मार्कंडेय सहकारी …

Read More »

महामंडळाची कार्यतत्परता; मंडळांनी हटवले तंबाखूजन्य जाहिरातीचे फलक

  बेळगाव : शहरातील काही गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तंबाखूजन्य विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते. ही बाब मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या निदर्शनास येताच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सामंजस्यपणे विमल गुटख्याच्या जाहिरातीचे फलक हटविले व आपली चूक सुधारत संबंधित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात व्यसनमुक्ती विरोधी जनजागृती करण्याचा …

Read More »

“वार्ता”चा इम्पॅक्ट! लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा, स्वीच बोर्ड दुरुस्त

  बेळगाव : लेले ग्राऊंडवरील विद्युत तारा व स्वीच बोर्ड खुले असल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रसारित केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले व काही तासातच सदर विद्युत तारा आणि उघड्यावर असलेले स्वीच बोर्ड तात्काळ दुरुस्त करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले. सदर बातमी प्रसारित …

Read More »

शिवसेनेतर्फे सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा

  बेळगाव :  सालाबाद प्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) यांच्यावतीने यंदा देखील ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण विभाग अशा दोन गटात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी श्री गणेश मूर्ती व मंडप परिसर स्वच्छता या …

Read More »