बेळगाव : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील झाडशहापूरजवळ आज दुपारी 2 च्या दरम्यान दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव भरत बिदरभावी असून झाडशहापूर येथील रहिवासी आहे. तो कामावरून घरी चालला असता वेगवान चाललेल्या गाडीने धडक दिली. या धडकेत भरतचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी
बेळगाव : मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाची व्यापक बैठक रविवार ता. 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष – रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष – रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस – महादेव पाटील आणि …
Read More »बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर येथे संपन्न झाला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नूतन अध्यक्षपदी सी. सी. होंडदकट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, कीथ मचाडो, सचिव राजेंद्र मुतगेकर, खजिनदार रोहित कपाडिया यांची 2023-24 या वर्षाकरिता …
Read More »जिल्हा पंचायत, तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना
बेळगाव तालुका पंचायतचे १० मतदार संघ घटवले बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक पंचायत राज मतदर संघ निर्णय आयोगाने विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या निश्चित केली असून, त्याची यादी प्रकाशित केली आहे. …
Read More »सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू
अथणी : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा काल रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. अथणी तालुक्यातील नदि-इंगळगाव गावचे सैनिक असलेले लक्ष्मण घोरपडे हे सुटीच्यानिमित्त गावी आले होते. त्यातच त्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. शहीद जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी …
Read More »धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविली
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जुनी असलेली मागणी पूर्ण झालेली असून धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले असल्याची माहिती राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांनी दिली. खासदार ईराण्णा कडाडी यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रेल्वे क्रमांक 17302 बेळगावहून सायंकाळी 7:45 वाजता …
Read More »कृष्णा देवगाडी याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी कराटे इंडिया ऑर्गनायझेशन यांच्यावतीने बेंगळुरू येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणीमध्ये 17 वर्षातील वयोगटात भाग घेऊन कृष्णा देवगाडी याने सुवर्णपदक पटकाविले व त्याला सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्र देउन सन्मान करण्यात आले. त्याकरिता कृष्णा याची राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. 21 …
Read More »बेळगाव शहरासाठी नोव्हेंबरमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस
बेळगाव : उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक मंडळाकडून डिसेंबरच्या अखेरीस बेळगाव शहरासाठी 50 इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामधील बसेसची पहिली तुकडी नोव्हेंबरच्या सुरुवातीला दाखल होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, डिझेलवर चालणाऱ्या 100 बस ग्रामीण भागासाठी दिल्या जातील, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रकारच्या वाहतूक सेवांमध्ये सुधारणा होईल. …
Read More »मनपा महापौर तसेच आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडंगुडी यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, रस्त्यांवर लोंबकळणार्या वीजतारांचे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्त अशोक दुडंगुडी ,शहर अभियंता सचिन कांबळे, …
Read More »आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. मनोज शिवाजी पवार हे होते. श्री. पी. ए. पाटील यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर उपाध्यक्ष श्री. संतोष शिवाजी पवार यांनी 2021 ते 2023 सालचा अहवाल व ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवण्यात आला. सर्व सदस्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta