Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव

मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ 2 फूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलाशयातील अतिरिक्त पाणी धरणातून सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला …

Read More »

विविध ठिकाणी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित

  बेळगाव : शहर परिसरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने उत्तर विभागातील संपूर्ण विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. हिंडलग्याला जाणाऱ्या सेंट झेवियर्स रस्त्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळी वृक्ष कोसळल्याने संपूर्ण उत्तर भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच मजगाव परिसरातही वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम …

Read More »

“त्या” नराधमावर कठोर कारवाई करावी; कडोली ग्रामस्थांचा निषेध

  बेळगाव : कडोली गावात काल घडलेल्या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोली ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत गावात अशांतता निर्माण करणाऱ्या कुटुंबाला गावातून हाकलून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना देण्यात आले. तत्पूर्वी कडोली ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार स्वेच्छेने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी …

Read More »

राकसकोप जलाशय लवकरच भरणार; चार फूट पाण्याची आवश्यकता

  बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने बेळगावनगरीतील नागरिकांना समाधान होत आहे. बेळगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेले राकसकोप जलाशय लवकरच भरणार आहे. 0.60 टीएमसी क्षमतेच्या जलाशयाची एकूण उंची 2475 फूट आहे. आजची पाण्याची पातळी 2471.4 फूट …

Read More »

अनमोड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

  खानापूर : बेळगाव लगतच्या महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावच्या सीमेवर मुसळधार पाऊस पडत आहे. बेळगाव-पणजी मार्गावरील अनमोड घाटात दूधसागर देवस्थान नजीक आज पहाटे दरड कोसळली असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात येईल. दरड कोसळत असल्याने या घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी …

Read More »

पंढरपूर येथे बेळगावच्या तरुणाचे निधन

  बेळगाव : वडगाव सोनार गल्लीमधील एका तरुणाचे पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सदर घटना बुधवारी (दि. १७) सकाळी दहा वाजता घडली. प्रवीण सुतार असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, प्रवीण वडगाव परिसरातील वारकऱ्यांना घेऊन आपल्या वाहनातून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपून …

Read More »

कडोलीतील अमानुष घटनेने गावात तणावाचे वातावरण; चोख पोलिस बंदोबस्त

  स्वीय सहायक मलगौडा पाटील यांनी केली पीडित कुटुंबियांची विचारपूस बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कडोली गावातील आझाद गल्ली येथील समीर अब्बास धामणेकर (30) याला पोलिसांच्या …

Read More »

मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

  आरोपी बेळगाव : मतिमंद तरुणीवर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळगावच्या काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आई -वडील शेताकडे गेल्याचा फायदा घेऊन एका नराधम तरुणाने एका मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कडोली येथे घडली. दरम्यान त्या मुलीच्या …

Read More »

एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये मराठा सेंटरच्या कुस्तीपटूंचे यश

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या विश्वजित मोरे आणि धनराज जमनिक या कुस्तीपटूनी एशियन कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये आपली चमक दाखवली. हे दोघेही कुस्तीपटू मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. विश्वजित मोरे याने तेवीस वर्षाखालील गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले. ही स्पर्धा …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूल येळ्ळूर येथे आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन

  बेळगाव : येळ्ळूर येथे दि. 16 जुलै आषाढी एकादशी निमित्त श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूलच्या वतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून दिंडीची सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, पुंडलिक, माऊली अशा विविध वेशभूषेत गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टाळ मृदंगाच्या साथीने …

Read More »