Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुका समिती शिष्टमंडळाने घेतली आमदार श्री. रोहित पाटील यांची सदिच्छा भेट

Spread the love

 

 

बेळगाव : रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्यामध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे दिवंगत नेते कै. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार श्री रोहित पाटील यांची भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. नामदार कै. आर. आर. पाटील यांनी सीमाप्रश्नी विशेष योगदान दिले होते, बेळगांव येथे २००६ मध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आपणही त्याच जोमाने सीमावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य श्री. गोपाळराव पाटील, श्री. यशवंतराव पाटील, श्री. सागर पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. विजय पाटील (गर्लगुंजी) व अन्य समितीनेते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *