Thursday , December 18 2025
Breaking News

बेळगाव

विद्याभारती बेळगावतर्फे अमित पाटील यांचा सत्कार

  बेळगाव : विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्याभारती कर्नाटक राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, संत मीरा शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, उद्योजक तुषार तहसीलदार, ओमकार देसाई, विद्याभारती …

Read More »

विभागीय हँन्डबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला उपविजेतेपद

  बेळगाव : धारवाड सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय हँडबॉल स्पर्धेत माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा शाळेने उपविजेतेपद पटकाविले. धारवाड येथील मल्लसजन व्यायाम शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या विभागीय हँडबॉल माध्यमिक मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात संत मीरा बेळगांवने धारवाड जिल्ह्याचा 10-9 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम …

Read More »

पोलीस उपायुक्त शेखर यांची बदली; रोहन जगदीश बेळगावचे नवे पोलीस उपायुक्त

  बेळगाव : राज्य सरकारने राज्यातील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. यामध्ये बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस उपायुक्त म्हणून 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य गृह खात्याने …

Read More »

पुष्पा स्टाईलने दडवलेला लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त

  बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विधानसभेत जवळ मालवाहू ट्रकमध्ये प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवलेला गोव्याहून अन्यत्र नेण्यात येणारा महागडा अवैध दारू साठा जप्त केल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अबकारी खात्याने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव येथे सापडलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा अवैध दारू साठा आहे. याबाबतची …

Read More »

रामतीर्थ नगर परिसरात आढळले नवजात मृत अर्भक!

  बेळगाव : रामतीर्थ नगर येथील एका खुल्या जागेत नवजात मृत पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बेळगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर येथील भरवस्तीत आज सकाळी पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती …

Read More »

शिवबसव नगर येथील हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश; दोघांना अटक

  बेळगाव : शिवबसव नगर येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीतील शिवबसव नगर येथे नागराज इराप्पा गाडीवड्डर या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडाने ठेचून खून केला होता. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले …

Read More »

टँकरच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

  बेळगाव : बेळगाव- खानापूर रोडवर रस्ता ओलांडताना पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उद्यमबाग बेंम्को समोर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जैरूनबी मोहम्मदसाब चौधरी (वय 74) असे सदर महिलेचे नाव असून ती राजाराम नगर, उद्यमबाग येथे राहणारी आहे. दुकानाला जाण्यासाठी रस्ता ओलांडताना सदर अपघात …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेच्या कुस्ती पटुंनी जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगण येथे या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थिनी ऋतुजा गुरव 45 किलो वजनी गट, …

Read More »

रयत गल्ली येथील समिधा बिर्जे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : फक्त शेतकरी कुळातच नव्हे तर हालगा-मच्छे बायपास अन्याय विरोधातल्या लढ्यात या मुलीसह पूर्ण कुटूंबाने झोकून देत आंदोलन केले होते. इतकेच काय तर समिधाच्या आईने आपली शेती कदापी देणार नाही म्हणून पोलिस फौजफाट्यासह आलेले शासकीय अधिकारी, महामार्ग ठेकेदाराना विरोध केला होता. अधिकाऱ्यांनी त्यांच्या उभ्या पिकात जेसीबी घालतानां पाहून …

Read More »

हॉकी बेळगावच्या वतीने हॉकी साहित्य वितरण

  बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने आज खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना हॉकी साहित्याचे वितरण करण्यात आले. हा वितरण सोहळा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी ताराराणी हायस्कूलच्या प्रांगणात मुख्याध्यापक राहुल जाधव, शिक्षिका अश्विनी पाटील व विद्यालयाच्या सुमारे 50 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हॉकी बेळगावचे …

Read More »