बेळगाव : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील पिके करपायला लागलेली आहेत. बटाटा, भात, सोयाबीन, भुईमूग, मका, रताळी अशी सर्व पिके पावसाळाअभावी मान टाकलेली आहे. पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर बळीराजा बसला असून सर्व शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिना हा कोरडा गेल्यामुळे शेतकरी हवालदिन …
Read More »चिंचली मायाक्का भक्तांचा ट्रॅक्टर उलटून युवती ठार
अथणी : चिंचली मायाक्का देवीच्या दर्शनासाठी जाणारा ट्रॅक्टर उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात काकमारी गावातील अक्षता कानमडी (20) हिचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काकामारी गावातील 20 हून अधिक भाविकांना चिंचली गावातील मायाक्कादेवी मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाणारा ट्रॅक्टर दुहेरी ट्रॉलीने चालकाचे नियंत्रण सुटल्याने …
Read More »शिवबसव नगर येथे युवकाचा दगडाने ठेचून खून
बेळगाव : बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथील स्पंदन हॉस्पिटल जवळ बुधवारी रात्री एका युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय 30 रा. रामनगर वड्डरवाडी) असे मृताचे नाव आहे. घटनस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार युवकाचा हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि दगडाने ठेचून त्याचा खून करून पसार झाले. घटनास्थळी …
Read More »बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव येथे राखी प्रदर्शनाचे आयोजन
बेळगाव : टीएफ सोसायटी संचलित बालिका आदर्श विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलींनी आज आपल्या स्वहस्ते बनवलेल्या राखींचे प्रदर्शन केले. यावेळी मुलींनी बनवलेल्या निरनिराळ्या सुंदर अशा राख्यांचे प्रदर्शन शाळेतील सौ. संगीता देसाई हॉलमध्ये पार पडले. या वेळेला या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. मोडक आणि सौ. मृदुला पाटील …
Read More »दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांची अचानक भेट; कागदपत्रांची पडताळणी
बेळगाव : बेळगाव लोकायुक्त एसपी हनुमंतरायप्पा यांनी दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. उपनोंदणी कार्यालयात मध्यस्थांचा हस्तक्षेप होत असल्याच्या जनतेच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी हनुमंतरायप्पा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकण्यात आला. कार्यालयावर छापे टाकून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. लोकायुक्तांच्या धाडीमुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले …
Read More »आपणच फूलटाईम शिक्षिका व टाॅपर, तर अन्य पार्टटाईम
मराठा मंडळ अन्यायग्रस्त इंग्रजी शिक्षिका यांचे प्रत्यूत्तर बेळगाव : मराठा मंडळाने दिलेल्या स्पष्टीकरणाला प्रतिक्रिया देताना अन्यायग्रस्त अक्षता नायक मोरे यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे साफ खोटे बोलत आहेत. आश्वासन एकदा नाही तर अनेकदा वारंवार दिले होते. मुलाखतीत नियमांचे नीट पालन केले नाही. आपण मेरीटमध्ये असतानादेखील अन्याय केला. मुलाखतीच्या वेळी …
Read More »कझाकिस्थान येथे होणार्या जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताकडून आदित्य कालकुंद्रे करणार प्रतिनिधित्व
बेळगाव : शट्टीहळ्ळी ता. हुक्केरी येथील आदित्य आप्पाजी कालकुंद्रे हा कझाकिस्थान येथे होणार्या जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अदित्य कालकुंद्रे याने मुंबई येथुन जिम्नॅस्टिक्स खेळाला सुरुवात केली आहे. दहावी पर्यंत मुंबई शहरात लहान गटातुन तालुका आणि …
Read More »मंगाई मंदिरासमोरील ‘ती’ भिंत हटविण्याची मागणी; मंगाईनगर रहिवाशांचे मनपाला निवेदन
बेळगाव : वडगाव येथील मंगाई मंदिरासमोर भर रस्त्यातच भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे मंगाईनगरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हे त्रासाचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता होता. मात्र त्यावर बेकायदेशीररित्या भिंत बांधण्यात आली असून तातडीने ती हटवावी आणि ये-जा करण्यासाठी आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाईनगर रहिवासी संघाच्यावतीने महापालिका …
Read More »“त्या” अपघातातील शिष्यांच्या कुटुंबीयांना अद्याप आर्थिक मदत नाही
रुद्रकेसरी मठाच्या हरिगुरु महाराजांचे सरकारवर टीकास्त्र : पत्रकार परिषदेत मांडली भूमिका बेळगाव : सुतगट्टी येथील मुनियप्पा काडसिद्धेश्वर महाराजांचा बेळगावला येताना भीषण अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले तर त्यांच्या सोबतच्या दोन शिष्यांचा दुर्दैवी अंत झाला. भीषण अपघात होऊनही स्वामीजी तसेच त्यांच्या शिष्यांना अद्याप आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. …
Read More »मेणसे कुटुंबियांच्याकडून शेतकरी गणेशोत्सव मंडळाला देणगी
बेळगाव : स्वराज्य शेतकरी कामगार युवक मंडळ, पारिजात काॅलनी भाग्यनगर अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 55 वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने मुळचे कलमेश्वर गल्ली येळ्ळूर व सध्या पारिजात काॅलनी भाग्यनगर अनगोळ येथे वास्तव्यास असलेले नामांकित व्यावसायिक श्री. मनोहर मेणसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेणसे या दांपत्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta