चांगळेश्वरी शिक्षण मंडळाच्यावतीने शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन येळ्ळूर : मराठी शिक्षक हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे रक्षक असतात. पुस्तकही शिक्षकांच्या जडणघडणीसाठी मार्गदर्शक असतात. शिक्षकांनी वाचनाचा छंद जोपासावा. शिक्षक हाच विद्यार्थी, समाज व देश घडवणारा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षकाने काळानुरूप बदले पाहिजेत, शिक्षणातले नवनवीन बदल अनुसरले पाहिजेत, कोरोना काळापासून सुरू झालेले …
Read More »कोजागिरी पौर्णिमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी समाज महिला मंडळ, वैशवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवारी रोजी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालय येथे कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी येथील वैश्य समाजाचे जेष्ठ सदस्य अनंत उचगांवकर, युवा वैश्य …
Read More »महापालिकेची सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा
बेळगाव : महापालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळालेल्या ८ कोटी रुपयांचा निधीबाबत अंतिमक्षणी माहिती देऊन निधी ११ रोजी परत जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने महापालिकेत एकच गोंधळ उडाला आहे. हा निधी परत जाऊ नये, यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. शहरातील रस्ते, गटार उभारणी, …
Read More »सकल मराठा समाजातर्फे रविवारी कँडल मार्च
फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावात रविवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता कँडल मार्च काढण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ जणांवर गुन्हा दाखल
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या …
Read More »साखर कारखान्यांनी आधी दर जाहीर करावा; जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत सूचना
बेळगाव : ऊस दराची घोषणा करण्याआधीच काही कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी कारखानदारांना दर जाहीर करण्यासंबंधी सूचनाही करण्यात आली होती. सध्या हंगाम सुरू केलेल्या व यापुढे सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नितेश पाटील यांनी केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी …
Read More »नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 100 कोटी अनुदान
बेळगाव : नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम येत्या जानेवारीत प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एम. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडांगणावर राज्योत्सव समारंभात …
Read More »काळ्यादिनी मराठी भाषिकांचा एल्गार!
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात आली. निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी उद्यानात …
Read More »सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर
बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमापश्नी आज बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश रजेवर असल्यामुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. कर्नाटकचे कायदामंत्री एच. के. पाटील यांनी पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचे …
Read More »सकल मराठा समाजाची उद्या बैठक
बेळगाव : बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक २ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठायोद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta