खानापूर (प्रतिनिधी) : सुळगे (येळ्ळूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार या निवृत्त झाल्या निमित्त त्याचा येळ्ळूर सीआरसी केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपी केंद्र प्रमुख महेश जळगेकर होते. यावेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, नोकर संघाचे जिल्हा कार्यदर्शि चंद्रशेखर कोलकार, शिक्षक संघाचे …
Read More »पतीचा खून करून पत्नीने रचला बनाव; मृतदेह चोर्ला घाटात
बेळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची घटना बेळगावात घडली असून, आता 4 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मृतक रमेश कांबळे (वय 38, रा. आंबेडकरनगर) हे व्यवसायाने पेंटर असून 28 मार्च रोजी बेळगाव येथून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीने (संध्या) एपीएमसी …
Read More »धक्कादायक; युवकाची आत्महत्या
बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री गणेशपुर येथे घडली. आर्किटेक्चर प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29, मूळचा रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महिन्यापूर्वीच त्याचा विवाह संपन्न झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना युवकाने अचानक दुसर्या खोलीत गळफास …
Read More »पतीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खून; भांडणातून उचललं टोकाचं पाऊल
रायबाग : हारूगेरी इथं बुधवारी सकाळी साडेनऊचा सुमारास पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. रुक्मव्वा मलाप्पा उप्पार (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. किरकोळ वादातून हा थरार घडला आहे. याबाबत हारूगेरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हारूगेरी येथील ईदगाहजवळ उप्पार परिवारासह राहत होता. मल्लाप्पा …
Read More »अनैतिक संबंधाची माहिती समजताच आईनं पोटच्या पोराचा केला खून
रायबाग पोलिसांची कारवाई रायबाग : आईनेच मुलाचा खून करून नैसर्गिक मृत्यू भासवल्याचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले. रायबाग पोलिसांनी ही कारवाई केली. अनैतिक संबंधाची माहिती मुलाला समजल्याने त्या महिलेने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचा खून केला होता. महिन्याभरानंतर हा प्रकार उघडकीस आला. हरिप्रसाद संतोष भोसले (रा. रायबाग) असे खून झालेल्या मुलाचे नाव …
Read More »भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात उद्योजकांचा मोर्चा
बेळगाव : भरमसाठ वीज दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला होता. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून उद्योजकांनी वीज दरवाढीचा निषेध करत ती मागे घेण्याची मागणी केली. हेस्कॉमने उद्योगांना मनमानी करत 30% ते 70% या प्रमाणात भरमसाठ वीज दरवाढ लागू केली आहे. परिणामी आधीच संकटात …
Read More »विद्यार्थ्यांना लवकरच अंडी, चिक्की आणि केळीचे वाटप होणार
बेळगाव : विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी अंडी, शेंगदाणा चिक्की व केळी यांचे वाटप केले जाते. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप अंडी, केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले नव्हते. अखेर शिक्षण विभागाला याची जाणीव झाली असून अंडी, केळी व चिक्की वितरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले …
Read More »चव्हाट गल्लीतील रहिवाशांचे पावसासाठी वरुणराजाला साकडे
बेळगाव : बेळगावातील चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी वरुणराजाला साकडे घातले आहे. लक्ष्मी टेकडीवर पूजा-अर्चा करून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. पावसासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता चव्हाट गल्लीतील रहिवाशांच्याकडून वरुणराजाला साकडे घालण्यात आले. जून महिना कोरडा गेल्याने सीमाभागात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि …
Read More »शाळा क्र. 25 मधील 1997-98 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
गोवावेस, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला -मुलींची शाळा क्र. 25 मध्ये शिक्षण घेतलेल्या 1997 -98 सालच्या बॅचमधील सातवीच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सदर स्नेह मेळाव्यास 1997 -98 साली सातवीच्या मुला-मुलींना शिकविणाऱ्या शिक्षिका हेमलता कानशिडे, शिक्षक गोविंद कुंभार, बळीराम कानशिडे तसेच सध्या शाळेत सेवा …
Read More »विद्यार्थी दत्तक योजनेला मदत करून धनंजय पाटील यांनी केला वाढदिवस साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 5000 रुपयांची देणगी दिली. मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेच्या निधीतून गोरगरीब विद्यार्थी किंवा पालकत्व हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक फी भरण्यासाठी मदत केली जाते. सदर योजनेसाठी खानापूर युवा समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta