Tuesday , April 21 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा बरखास्तीची टांगती तलवार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महापालिकेने नियमानुसार मालमत्ता कर 2021-22 सालापासून वाढलेला नाही. मालमत्ता कर वाढविण्याचा निर्णय झाला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याचा ठपका ठेवून महापालिका प्रशासन संचनालयाने (डी एम ए) बेळगाव महापालिकेला पालिका बरखास्त का करू नये यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे नगरसेवक-नगरसेविका तसेच पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मध्यंतरी ही काही महिन्यांपूर्वी बेळगाव महानगरपालिकेच्या बैठका वेळेवर होत नसल्याची तक्रार ऐकायला मिळत होती. त्यातच महापालिका बरखास्त होणार अशी ही चर्चा होती. महापालिका बरखास्त होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर पालिकेतील बैठकांना जोर चढलेला दिसून आला होता. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेला मिळालेल्या बरखास्तीच्या नोटिसीमुळे सर्व बेळगावकरांचे लक्ष महापालिकेकडे लागून राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *