बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 5000 रुपयांची देणगी दिली. मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेच्या निधीतून गोरगरीब विद्यार्थी किंवा पालकत्व हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक फी भरण्यासाठी मदत केली जाते. सदर योजनेसाठी खानापूर युवा समितीचे …
Read More »एसपीएम रोडवरील पाणी गळतीची महापौरांकडून पाहणी
बेळगाव : शहरातील एसपीएम रोडवर रेणुका हॉटेलनजीक फुटपाथखाली भूमिगत जलवाहिनीला लागलेल्या गळतीची आज महापौर शोभा सोमनाचे यांनी पाहणी करण्याबरोबरच जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याचा आदेश दिला. एसपीएम रोडवर रेणुका हॉटेल जवळ भूमिगत जलवाहिनीला गेल्या दोन आठवड्यापासून गळती लागली आहे त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी फूटपाथवर वाहून वाया जात होते. यासंदर्भात …
Read More »डॉ. बोरलिंगय्या यांचा बदलीनिमित्त निरोप समारंभ
बेळगाव : बेळगाव हा शांतिप्रिय प्रदेश आहे. त्याला गालबोट लागू देऊ नका, सर्वानी मिळून मिसळून राहा, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी त्यांच्या निरोप समारंभात केले. राज्य सरकाने आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची अन्यत्र बदली केली आहे. बेळगावच्या पोलीस आयुक्तपदाची गेली दीड वर्ष समर्थपणे …
Read More »बिजगर्णीत येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
बिजगर्णी : गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, गावात कोणतीच समस्या दिसू देणार नाही असे उदगार ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील गटारी अन भूमिगत गटारींच्या कामांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या ८ लाखांच्या निधीतून हे विकास कामांचे उद्घाटन …
Read More »बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
Read More »इनरव्हील लेडीज विंगकडून भगवान महावीर इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप
बेळगाव : अभ्यासाबरोबर खेळाचीही आवड निर्माण व्हावी यासाठी बेळगावच्या इनरव्हील लेडीज विंग यांच्यातर्फे भूतरामहट्टी येथील श्री भगवान महावीर इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात हा क्रीडा साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला. शाळेच्या प्राचार्या निशा राजेंद्रन यांनी इनरव्हील लेडीज विंगच्या अध्यक्ष श्रीमती शालिनी चौगुला आणि …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक योग दिन
बेळगाव : 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर येथे आर्ट ऑफ लिविंग चे सदस्य गोपाळकृष्ण, श्रीमती सेजल पत्रावळी त्यांचे सहकारी व विश्वभारत सेवा समिती शहापूर बेळगाव या संस्थेचे सेक्रेटरी श्री. प्रकाश नंदिहळी, प्राचार्या श्रीमती ममता पवार यांच्या उपस्थितीत योग कार्यक्रम संपन्न झाला. …
Read More »सामूहिक योगाद्वारे योग दिन साजरा
बेळगाव : सामूहिक योगाद्वारे प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा आयुष्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी सकाळी सुवर्ण विधानसौध प्रांगणात सामूहिक योगासने करून 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बेळगाव सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज सोमवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत …
Read More »नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस मारुती मंदिरात साजरा
बेळगाव : “आज प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असला तरीही प्रत्येकाने नियमितपणे योग करण्याची गरज आहे त्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांपासून आपण जो योगा वर्ग इथे चालू ठेवला आहे त्यातील सातत्य पाहून कौतुक वाटते त्यासाठी श्री. कुलकर्णी सरांचे अभिनंदन” अशा शब्दात वार्ड क्रमांक 29 चे नगरसेवक श्री. नितीन जाधव …
Read More »बेळगाव उत्तर विभाग आयजीपी पदी बी. एस. लोकेश कुमार यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगावचे माजी पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार यांची आता बेळगाव उत्तर विभाग आयजीपी अर्थात पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पदावर असलेल्या आणि परिश्रमपूर्वक उत्तर विभाग सांभाळलेल्या आयजीपी एन. सतीश कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बेळ्ळारी येथून बी. एस. लोकेश कुमार (केएन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta