बेळगाव : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेंगलोर तालुका खानापूर घटक खानापूरच्या वतीने शनिवार दिनांक 3 जून 2023 रोजी केदार मंगल कार्यालय फिश मार्केट समोर खानापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय व चांगल्या पद्धतीचे …
Read More »हवाई दलाच्या 2,675 अग्नीवीरांचा दीक्षांत सोहळा दिमाखात
बेळगाव : बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याद्वारे भारतीय हवाई दलात देश सेवेसाठी रुजू होण्यास सज्ज असलेल्या 2,675 इतक्या अग्नीवीर जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. सांबरा हवाई दल परेड मैदानावर आज आयोजित या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख …
Read More »महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक
बेळगाव : गृहलक्ष्मी, युवानिधी, अन्नभाग्य यासह पाच ‘हमी’ लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याची पुरेशी अंमलबजावणी करावी, लाभार्थ्यांची ओळख पटवावी आणि जिल्ह्यातील संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व तयारी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पूर व्यवस्थापन व विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत …
Read More »रयत गल्लीतील ड्रेनेज तुंबले; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
बेळगाव : मनपाचे ठेकेदार तसेच कर्मचारी इतके निर्ढावलेले आहेत कि जनतेच्या आरोग्याशी त्यांचे देणेघेणे अजिबात नाही. जनतेशी निगडीत समस्या सोडविण्याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. खांबावरील लाईट दुरुस्ती, कूपनलिका दुरुस्ती, गटारी स्वच्छ नाहीत की ड्रेनेज स्वच्छ नाहीत. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याच्या खाली ड्रेनेज झाकण गेल्याने जर एखादी समस्या उद्भवली …
Read More »घरगुती भांडणावरून पत्नीची हत्या!
बेळगाव : घरगुती भांडणावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पती पोलिसांना शरण आला आहे. ही घटना मुडलगी तालुक्यातील नागनूर गावात शुक्रवारी रात्री 10.30 वाजता घडली. बसव्वा हणमंत हिडकल (30) असे दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. आरोपी पती हणमंत सिद्धप्पा हिडकल (35) याच्यावर खुनाचा आरोप आहे. याबाबत समजलेली …
Read More »रविवारी कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे येत्या रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दहावी परीक्षेतील विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हिंडलगा ग्रा. पं. सदस्या रेणू गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख …
Read More »हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिराची सांगता
बेळगाव (प्रतिनिधी) : केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी बेळगावने मुला-मुलींसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी येथे शिबिराचे आयोजन केले होते. याचा लाभ ५० मुला-मुलींनी घेतला, असे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी …
Read More »बी. के. कॉलेजमध्ये 5 रोजी सत्कार, व्याख्यानाचे आयोजन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव, ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयएएस 2023-24 परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींचा सत्कार सोहळा, मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यान अशा संयुक्त …
Read More »ब्रह्माकुमारीतर्फे बेळगावात तंबाखू विरोधी दिनाचे आचरण
बेळगाव : महांतेश नगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी बेळगाव रेल्वे स्थानकावर जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव उपविभागाच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. अंबिका यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माउंट आबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयातून आलेल्या बी. के. अच्युत यांनी …
Read More »कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात गुरुवारी सकाळी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील नऊ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सीमा भागातील कन्नड सक्ती हटावी यासाठी 1 जून 1986 रोजी मोठ्या प्रमाणात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta