ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी सचिव अंजुम परवेझ बेळगाव : महाराष्ट्रातून नद्यांची आवक, पर्जन्यमान, जलाशयाची पातळी आणि पाण्याचा विसर्ग यावर लक्ष ठेवून पूर व्यवस्थापन अत्यंत शास्त्रीय आणि प्रभावी पद्धतीने करता येते. तेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना ग्रामविकास व पंचायत …
Read More »ग्रा. पं. सदस्यांनी दिले कासवाला जीवदान!
बेळगाव : रस्त्यावर सापडलेल्या कासवाला जीवदान देताना सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. पं. सदस्यांनी त्याला सुखरूपपणे गावच्या तलावात सोडल्याची घटना आज गुरुवारी सकाळी कंग्राळी बुद्रुक येथे घडली. याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, कंग्राळी बुद्रुक येथे आज सकाळी वेशीच्या वस्तीकडे जाणाऱ्या ग्रा. पं. सदस्य सुरेश राठोड यांच्या गाडीसमोर एक कासव आले. …
Read More »मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन केंद्रामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध खाजगी तसेच काही सरकारी ऑनलाईन केंद्रांवर पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या अंतर्गत आज मुतगा येथील एका खाजगी ऑनलाईन केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहेत. खाजगी ऑनलाईन सेंटर वरून ग्राम वन केंद्राची आय …
Read More »कृषी अधिकाऱ्यांनी केली बळ्ळारी नाला पुराची पहाणी
बेळगाव : येळ्ळूर रस्त्यापासून सुरु होणारा बळ्ळारी नाला परिसरात आठ दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊन परिरातील अनगोळ, शहापूर, वडगाव, माधवपूर, जूनेबेळगाव, हालगा, अलारवाड, बेळगावसह इतर शिवारात पूर आल्याने शेतकऱ्यांच्या भातपीकांसह इतर पीकं पाण्यात असल्याने संपूर्ण शेतकरी चिंतेत आहे. याला मुख्य कारण बळ्ळारी नाल्याची खुदाई न …
Read More »महिलांना रोजगार देण्याकरिता एंजल फाउंडेशनने घेतला पुढाकार
बेळगाव : महिलांना काम मिळावे तसेच त्यानी घराबाहेर पडून आपल्या पायावर उभे राहावे. या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकाम, विणकाम तसेच पापड तयार करणे याशिवाय विविध कामांविषयी माहिती देण्यात आली. सर्व महिलांना रोजगार मिळावा याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी शहरांमध्ये महिलांना रोजगार देण्याकरिता बैठका सुरू केल्या …
Read More »घराची भिंत कोसळून अथणी येथे तरुणाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. काशिनाथ आप्पासाबा सुतार (वय 23, रा. तासे गल्ली, बेळगाव जिल्ह्यातील अथणी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून तरुणाच्या अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अथणीचे पीएसआय व सीपीआय घटनास्थळी भेट देऊन …
Read More »जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रांना उद्या सुट्टी
बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावरील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रासह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (ता. 27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. …
Read More »धामणे ग्रा. पं. पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे विजयी
बेळगाव : धामणे ग्रामपंचायतीच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5च्या पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजय संपादन केला आहे. धामणे ग्रामपंचायतच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5 ची पोटनिवडणूक गेल्या रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी 951 पैकी 810 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर आज बुधवारी या निवडणुकीचा …
Read More »जिल्ह्यातील धबधब्यांच्या भेटींवर निर्बंध : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला जिल्ह्यातील सर्व पाण्याच्या धबधब्याजवळ जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. धबधब्याजवळ येताना फूटपाथ कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना राज्यभरात नोंदल्या जात आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधब्याजवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले …
Read More »गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलत द्या
मध्यवर्ती महामंडळाची मागणी; पालकमंत्री जारकीहोळींना निवेदन बेळगाव : हेस्कॉमने वीजदरात मोठी वाढ केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे मंडळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाबाबत लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta