Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने 67 हुतात्म्यांना अभिवादन

  बेळगाव : 1969 मध्ये मुंबई येथे झालेल्या सीमा आंदोलनात बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज बुधवारी सम्राट अशोक चौक येथे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिल्हा प्रमुख शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्षपदी अंकुश केसरकर

  सरचिटणीस पदी श्रीकांत कदम यांची फेरनिवड बेळगाव : मागील कार्यकरणीचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडीचा निर्णय घेण्यात आला व अध्यक्षपदी श्री. अंकुश अरविंद केसरकर व सरचिटणीसपदी श्रीकांत कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अंकुश केसरकर यांचा सत्कार नगरसेवक शिवाजी मंडोळकर व युवा नेते शुभम …

Read More »

कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे भाविकांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता : आमदार अनिल बेनके

  बेळगाव : दिनांक 08 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे भेट दिली व आश्वासनानुसार कणबर्गी गाव ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. रहिवाशांच्या मागणीनुसार देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि देवस्थानच्या प्रवेशद्वारावर काँक्रीटची उभारणी, पथदिवे बसवणे, भाविकांच्या वापरासाठी …

Read More »

समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याकडून खेळाचे प्रशिक्षण

  बेळगाव : समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी हिंदवाडी येथील आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांसाठी कब्बडीचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी सदर खेळाचे प्रशिक्षण माधुरी जाधव-पाटील यांनी देत आहेत. मुलांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ राहावे, तसेच क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवावे, या दृष्टिकोनातून त्यांनी हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय …

Read More »

श्री सप्तकोटेश्‍वर मंदिराचा लोकार्पण सोहळा

  बेळगाव (प्रतिनिधी) : श्री सप्तकोटेश्‍वर देवस्थान समिती नार्वे डिचोली गोवा पुरातन खाते गोवा सरकार यांच्या वतीने गुरुवार दि. 9 फेब्रुवारी ते शनिवार दि. 11 फेब्रुवारी पर्यंत श्री सप्तकोटेश्‍वर मंदिराचा लोकार्पण सोहळा या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवार दि. 9 फेब्रुवारी पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, देवतास्थापना, मुख्यदेवता, भवानी शंकर श्री …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम शनिवार (ता.11) रोजी सकाळी 8-30 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडीच्या पटांगणात होणार आहे. 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ …

Read More »

चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळावा ५ मार्चला बेळगावात

  बेळगाव : कर्नाटक राज्य हरळ्ळया (चर्मकार) समाजवतीने रविवार दिनांक 5 मार्च रोजी राज्य स्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात प्रोत्साह फाउंडेशनच्या पुढाकाराने चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोत्साह फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत 5 मार्च रोजी येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात मोफत वधू …

Read More »

खासदार संजय राऊत यांना बेळगावात अटकपूर्व जामीन मंजूर

  बेळगाव : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूकीच्या काळात बेळगाव येथे येऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला …

Read More »

बेळगावात रंगणार पहिले बालनाट्य संमेलन!

  बेळगाव : बेळगावमध्ये १८ व १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ आयोजित पहिले बालनाट्य संमेलन रंगणार आहे. ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकत बेळगावमध्ये या साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलन बेळगाव येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये आयोजिण्यात आले आहे. हे संमेलन सुमारे तीनशे मुलांसाठी …

Read More »

ट्रॅक्टरच्या चाकात सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    अथणी : अथणी तालुक्यातील तेवरट्टी गावात आज ट्रॅक्टरच्या चाकात सापडून सात वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. सुदर्शन निलजगी (७) असे मयत बालकाचे नाव आहे. आज सकाळी मुलगा मामासोबत ट्रॅक्टरने शाळेसाठी निघाला होता. शाळा आल्यानंतर तो शाळेत जाण्यासाठी खाली उतरत ट्रॅक्टरची धडक बसून मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना …

Read More »