Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारकार्याचा आज येळ्ळूरातून शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावातून बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचार व पदयात्रेचा शुभारंभ रविवार दि. 23 रोजी सायंकाळी 5 वा. करण्यात येणार आहे. येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी देवीला राखणीचा नारळ ठेऊन कोंडुसकर यांच्या प्रचार कार्याचा …

Read More »

पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करेन ; डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : खानापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजपच्या बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करू, असे सांगितले आहे. खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मी संपूर्ण …

Read More »

म. ए. समितीच्या प्रचाराला नेते पाठवा; मात्र राष्ट्रीय पक्षांचा प्रचार नको

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना मध्यवर्ती समितीचे पत्र बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून म. ए. समितीच्या उमेदवारांनी सर्व ताकदीनिशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या प्रचारासाठी नेतेमंडळींनी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. बेळगावात येणाऱ्या नेत्यांची नावे द्यावीत, याचबरोबर राष्ट्रीय पक्षांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील …

Read More »

उद्या पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार; 27 मे रोजी मिरवणूक

  श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक संपन्न बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक श्री. नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी पारंपारिक शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी व शिवभक्तानी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे …

Read More »

यमकनमर्डी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मारुती नाईक यांचा अर्ज दाखल

  बेळगाव : यमकनमर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. मारुती तिप्पन्ना नाईक, सेवा निवृत्त सैनिक यांनी अर्ज दाखल केला. तब्बल १५ वर्षानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने यमकनमर्डी संघातून आपला अधिकृत उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे यमकनमर्डी मतदार संघातील मराठी जनतेच्या मनात नव चैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी उमेदवार श्री. …

Read More »

रमाकांत कोंडुस्कर व ऍड. अमर येळ्ळूरकर यांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण मतदार संघातून रमाकांत कोंडुस्कर तसेच उत्तर मतदार संघातून ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र एकीकरण समितीला लागलेले दुहीचे ग्रहण संपल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे याची प्रचिती आज …

Read More »

आर. एम. चौगुले यांना भरघोस मताने निवडून आणूया

  हुतात्म्यांना विनम्र अभिवादन उचगाव : बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील विधानसभेसाठी उभे असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या सदाशिवनगर येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये १९८६ च्या आंदोलनामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत. हुतात्म्यांचे स्वप्न साकार करूया …

Read More »

रमाकांत कोंडुसकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत दादा कोंडुसकर यांचा उमेदवारी अर्ज उद्या दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भरण्यात येणार आहे. आंबेडकर भवन येथून सुरू होऊन आरटीओ सर्कल सोन्या मारुती मंदिरपासून भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तरी दक्षिण …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात आज 79 तर एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवारी दिवसभरात एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये 71 पुरुष आणि 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज बुधवारी पाचव्या दिवशी सर्वाधिक …

Read More »

हिंमत असेल तर भाजपने मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्या; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

  बेळगाव : भारतीय जनता पक्ष देश लुटत आहे. पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय धनाढ्य बनत चालले आहेत. तर दुसरीकडे देश कंगाल बनत चालला आहे अशी टीका करून भाजपने पराभव स्वीकारला पाहिजे. भाजपच्या पराभवाची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. मोदी लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर त्यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्या, असे आवाहन आम आदमी …

Read More »