Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी : शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव : लेंडी नाला व बेळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढून नाला पूर्णपणे स्वच्छ करावा तसेच पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लेंडी नाला व बेळ्ळारी नाला वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित आहे. अनेकदा मागणी करून देखील या नाल्याची साफसफाई करण्याची तसदी स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. …

Read More »

बेळगाव-सांबरा रस्ता होणार सहा किंवा चौपदरी

  बेळगाव : रायचूर-बाची राज्य महामार्गावर येणार्‍या बेळगाव-सांबरा रस्त्यादरम्यान सहा पदरी किंवा चौपदरी रस्ता बांधकामासंदर्भातील योजनेवर स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजूर करण्यात येईल, असे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. कर्नाटक विकास कार्यक्रम अर्थात केडीपीची पहिली तिमाही बैठक आज मंगळवारी सुवर्ण विधान सौध येथे घेण्यात आली. प्रगती आढावा बैठकीच्या …

Read More »

दुसऱ्या रेल्वे रुळाशेजारील भिंत कोसळण्याच्या मार्गावर!

  बेळगाव : दुसर्‍या रेल्वेगेटजवळील रेल्वे रुळाशेजारील भिंत कलली असून, ती कधीही कोसळण्याचा मार्गावर आहे. यामुळे या ठिकाणाहून जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना आणि रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही भिंत सुमारे सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आली आहे. दुसर्‍या रेल्वे गेट टिळकवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूला रेल्वेचे रेडिमेड कुंपण एका बाजूला …

Read More »

श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज आयोजित मातृ – पितृ वंदना कार्यक्रम

  बेळगाव : श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज बेळगाव यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता. कच्छमध्ये गावातील वरिष्ठ जोडप्यांचा आणि नागरिकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे त्याला अनुसरून बेळगावात प्रथमच वरिष्ठ अशा 49 जोडप्यांचा सत्कार करण्याचा अनोखा आणि अनुकरणीय उपक्रम …

Read More »

बैलहोंगल येथे कारला दुचाकीची धडक; मुलाचा मृत्यू

  बैलहोंगल : सौंदत्ती रोडवरील जालिकोप्पजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. चिवटगुंडी गावातील संदिप सिद्धप्पा मल्लुर (11) असे मृत मुलाचे नाव आहे. दुचाकीस्वार इराप्पा चन्नाबसप्पा बगनाळ (३२) आणि पाठीमागून आलेले शिवाप्पा बसवंतप्पा मल्लूर हे दोघे धारवाडहून बैलहोंगलकडे येत असताना बैलहोंगल ते कित्तूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली. …

Read More »

पशु संजीवनी रुग्णवाहिकांचे उद्घाटन

  बेळगाव : शेतकरी आणि पशुपालकांच्या सोयीसाठी बेळगाव विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 87 सुसज्ज पशु संजीवनी रुग्णवाहिकांचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. बेळगाव सुवर्णसौध येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री प्रभू चव्हाण आणि गोविंद कारजोळ यांच्यासह जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि इतर अधिकारी तसेच …

Read More »

नवलगुंद येथे 21 जुलै रोजी हुतात्मा दिन

  बेळगाव : 21 जुलै रोजी नवलगुंद परिसरातील लिंगराज सर्कल येथे 42 वा शेतकरी हुतात्मा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धगौडा मोदगी म्हणाले, शेतकरी हुतात्मा दिन हा संपूर्ण देशातील शेतकरी चळवळीचा महत्त्वाचा भाग …

Read More »

अमर बांदिवडेकर यांचा सत्कार संपन्न

  बेळगाव : ज्यांनी आपली हयात कराटेपटूंना घडविण्यासाठी खर्ची घातली त्या अमर बांदिवडेकर हे राष्ट्रीय पातळीवरील कराटेमधील सुवर्णपदक मिळविणारे पहिले बेळगावकर होत. त्यांचा आज जो सन्मान होत आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांनी आयुष्यभरात अनेकांना सहकार्य केले. त्यामुळेच अनेक जण उभा राहू शकले असे विचार श्री. मल्लिकार्जुन जगजंपी यांनी बोलताना व्यक्त …

Read More »

घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे शानदार उद्घाटन बेंगळूरू : स्वातंत्र्य संग्रामात मराठा समाजाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी राष्ट्राच्या हितासाठी आपले कार्य केले अशा मराठा समाजाने आपल्या जीवनात नेहमीच मोठी साथ दिली आहे. या समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण निश्चितच …

Read More »

कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

आ. श्रीमंत पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : चोऱ्या, घरफोड्या वाढूनही दुर्लक्ष केल्याचा ठपका अथणी : कागवाड मतदार संघातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळीच करायला हवा. परंतु, त्यांच्याकडून निष्काळजीपणा दाखवला जात आहे. कामचुकार पोलीस अधिकारी व पोलिसांना समज द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व कागवाडचे …

Read More »