Monday , April 20 2026
Breaking News

तांत्रिक बिघाडामुळे व्हाट्सअपची सेवा ठप्प

Spread the love

 

बेळगाव : संपूर्ण जगभरात संवादाचे एक महत्त्वाचे साधन मानले गेलेल्या व्हाट्सअपची सेवा 12.30 ते 1.30 दरम्यान तासाभरासाठी बंद झाली होती. तांत्रिक अडचणीमुळे व्हाट्सअपची सेवा बंद झाल्याचे कळते.
व्हाट्सअप सेवा बंद झाल्यामुळे कोट्यावधी युजेसना आपले संदेश पाठवण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येऊ लागले. दरम्यान व्हाट्सअपची सेवा कशामुळे खंडित झाली आहे यासंदर्भात अद्यापही कोणतीच अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. गेल्या तासाभरापासून असलेल्या व्हाट्सअप बंदमुळे जगभरातील कोट्यावधी व्हाट्सअप युजर्सना ताटकळत राहावे लागले आहे.
केवळ भारतातच whatsapp चे 48 कोटी युजर्स आहेत. व्हाट्सअप सेवा ठप्प झाल्यामुळे व्हाट्सअप वरील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग बंद झाले आहे. दरम्यान काही वेळापूर्वी लवकरच व्हाट्सअप सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मेटा कंपनीने दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *