सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई …
Read More »गोकुळकडून दूध खरेदी दरातही दरवाढ; नव्या दराची अंमलबजावणी सुरु
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ संघाकडून दूध विक्री दरात वाढ करुन ग्राहकांना झटका दिला असला, तरी म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करत उत्पादक शेतकर्यांना दिलासा दिला आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध खरेदी दरवाढीचा निर्णय झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील …
Read More »सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य शासनाकडून सेंद्रिय शेतीसाठी सर्व प्रकारची मदत देण्यात येणार कोल्हापूर (जिमाका): जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारीला पंचगंगा काठावर महाआरती; घाट परिसर ‘चकाचक’ करण्यास सुरुवात!
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. याच दिवशी पंचगंगा नदी काठावर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरतीसाठी पंचगंगा घाटावर डागडुजी सुरु करण्यात आली आहे. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत महाआरती होईल. त्यामुळे …
Read More »कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण निश्चितपणे कायमस्वरुपी काढणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस …
Read More »खेळताना पिठात पडला, नाका तोंडात पीठ गेल्याने 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत; अख्खं कोल्हापूर हळहळलं
कोल्हापूर : कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने आज आपला जीव गमवावा लागला आहे. कृष्णराज राजाराम यमगर (वय 9 महिने, रा.जुना वाशीनाका) असं या गोड आणि गोंडस चिमुकल्याचे नाव असून ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या …
Read More »हसन मुश्रीफांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी
कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी केली आहे. कागलमधील काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष …
Read More »कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. चौघा जणांच्या टोळीकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्य तसेच क्रेटा कार आणि मोबाईल फोन असा 12 लाख 62 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर (ता. पन्हाळा) सापळा रचून ही …
Read More »अपहरण करुन 20 लाखांच्या खंडणीची मागणी; पाच लाख दिल्यानंतर सुटका
कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार कोल्हापूर : कोल्हापुरात अपहरण करुन खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टोप संभापूरमधील हॉटेल व्यावसायिकाचे आठ ते दहा जणांच्या टोळीने अपहरण करुन सुटकेसाठी 20 लाखांची खंडणी मागितली होती. यामधील 5 लाख रुपये मिळाल्यानंतर व्यावसायिकाला सोडून देण्यात आले. ही घटना शिरोली एमआयडीसी परिसरात घडली. हॉटेल मालकाच्या …
Read More »कोल्हापूरवासीयांकडून बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन!
कोल्हापूर : भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याविरोधात मराठी माणूस पेटून उठला यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. सीमावासीयांच्या नेहमीच पाठीशी असणाऱ्या कोल्हापूर वासीयांनी बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी मध्यवर्तीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta