कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले. …
Read More »दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज
आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचा …
Read More »‘शाहू छत्रपती’ चित्रपटाच्या माध्यमातून शाहू विचार सर्वदूर पोहचतील : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार भावी पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य आणि …
Read More »कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढला मोर्चा
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. राजेश क्षीरसागर हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील एकत्र फोटो समोर आला आहे. राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सामिल झाल्याने कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव …
Read More »कोल्हापूर येथे गांजा तस्करी करणारे दोघे जेरबंद ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात गांजा तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. रमेश दादासाहेब शिंदे ( वय ४४, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) आणि समाधान मारुती यादव (वय २९, रा. घाटंग्री जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतींचा ३१ किलो १३० …
Read More »24 तिर्थंकर विधानांतून विश्वशांतीचा संदेश… महा पट्टाभिषेक महोत्सव धार्मिक उत्साहात सुरू…
कोल्हापूर : अतिप्राचीन स्वस्तिश्री लक्ष्मीसेंन महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर रायबाग होसुर बेळगाव… या मठामध्ये नूतन मठाधिपती प पु विचारपट्ट 105 क्षुल्लक श्री भरतसेन स्वामी यांचा पट्टाभिषेक महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 24 तिर्थंकर विधानपूजा मोठ्या भक्तिभावनेनी सम्पन्न झाली.. या पूजेचे सौधर्म इंद्र इंद्रायणी पदी महावीर अण्णासाहेब पाटील सौ. स्वाती महावीर पाटील …
Read More »मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र
कोल्हापूर (जिमाका): जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होतं.. ’करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचं! कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील …
Read More »जगातील दुर्मिळ ब्रेन बायपास सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी!
सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ …
Read More »धनंजय महाडिकांचा कोल्हापुरात पोहोचण्यापू्र्वीच बंटी पाटलांना अप्रत्यक्ष इशारा
कोल्हापूर : तब्बल आठ वर्षांनी विजयाची चव चाखलेल्या नुतन खासदार धनंजय महाडिक यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोल्हापुरात करण्यात आली आहे. त्यांची मिरवणूक अंबाबाई मंदिरात येऊन संपणार आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच कराडमध्येच धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे पालकमत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा …
Read More »आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात
आजरा : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलीसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद उर्फ बाबा खान (वय 54, रा. योगायोग नगर, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta