Thursday , November 21 2024
Breaking News

कोल्हापूर

संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज

  कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी मतदारांना आश्वासनं देत आहेत, विकासकामांच्या आणि निधीच्या घोषणा करत आहेत. अनेक पक्ष साम-दाम-दंड-भेद हे धोरण राबवत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील सरपंचांना मतांसाठी सज्जड दम भरल्याचं प्रकरण ताजं असतानाच …

Read More »

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे सुद्धा रिंगणात

  कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा केली आहे. ताराराणी पक्षाच्या वतीने आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. इथं जातीचे कार्ड चालणार नाही, कोण …

Read More »

रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट प्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू

  कोल्हापूर : आयपीएल स्पर्धा सध्या जोशात सुरु आहे. अशात कोल्हापुरात अत्यंत क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमी माणसाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना होता. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद झाला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा सीएसकेचा फॅन असलेल्या एका क्रिकेटप्रेमी रसिकाने केली. त्यानंतर त्यांचं …

Read More »

महायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र!

  मुश्रीफ – घाटगे अन् मंडलिकांची बंद खोलीत चर्चा कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून उमेदवारी मिळणार की नाही या प्रतीक्षेमध्ये असलेल्या कोल्हापुरातील शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेच आहेत, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने उमेदवार असणार …

Read More »

मान्सूनपूर्व कामे मे अखेर पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक संपन्न कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा. तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी “ॲक्शन प्लॅन” तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी …

Read More »

हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टींविरोधात सुजित मिणचेकर, चेतन नरके या दोन नावांची चर्चा

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून हातकंणगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. चेतन नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत …

Read More »

राजकीय जाहिरात प्रमाणिकरण, पेड न्यूज आणि फेक न्यूजबाबत माध्यम कक्षाची स्थापना

  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून माध्यम कक्षाची पाहणी कोल्हापूर (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ 47 व 48 करिता माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. या कक्षामध्ये …

Read More »

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात; चार ठार

  पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू …

Read More »

कोल्हापूरातून शाहू महाराजांविरोधात थेट समरजितसिंह घाटगे रिंगणात?

  कोल्हापूर : राज्यामध्ये अवघ्या चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित केल्यानंतर आता भाजपने शांतीत क्रांती करत आपला पत्ता उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही, याची चर्चा रंगली असताना आता …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील तपासणी चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा समन्वय बैठकीत निर्णय

  कोल्हापूर (जिमाका) : येत्या दोन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेसीडन्सी क्लब कोल्हापूर येथे याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील …

Read More »