Tuesday , December 3 2024
Breaking News

चंदगड

श्रीकांत पाटील ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

  चंदगड : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र व कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांना ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे नुकतेच थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने …

Read More »

भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्काराने मनोहर भुजबळ सन्मानित

चंदगड (प्रतिनिधी) : सुरूते (ता.चंदगड) येथील रहिवासी व साडी येथील संत तुकाराम हायस्कूलचे अध्यापक मनोहर कृष्णा भुजबळ याना शामरंजन बहुद्देशीय फाउंडेशन, मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने भारत कर्तव्यम् शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय संस्कृती संमेलनात समाजसेवक, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व ज्येष्ठ समाजसेविका …

Read More »

बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय पाटील यांना “भारत कर्तव्यम्” समाजभूषण पुरस्कार

  पद्मश्रीकार डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात यंदाचा “भारत कर्तव्यम्” समाज भूषण पुरस्कार चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय केदारी पाटील यांना प्रदान करण्यात आला. …

Read More »

आपल्या ज्ञानेंद्रियांची कवाडे सदैव उघडी ठेवा; अध्ययन करा व अद्यावत रहा! : प. पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी

  डॉ. घाळी जन्मशताब्दीपूर्ती सांगता समारंभ निमित्य तेऊरवाडी (एस. के. पाटील) : “प्रत्येक दगडात मूर्ती असतेच. मूर्तीवरील अनावश्यक थर बाजूला करण्याचे काम शिक्षण करते. शिक्षणाने प्रतिभा बाहेर येते. भारतीय शिक्षण संवेदनशील आहे सहानुभूती व सौहार्दाचे दर्शन घडवणारी आपली भारतीय संस्कृती महान आहे. विश्व एक विद्यापीठ आहे. शिकण्यासाठी सदैव सज्ज रहा. …

Read More »

कोदाळीच्या सुभेदार मेजर रमेश गावडे यांना राष्ट्रपतींकडून ऑनररी लेफ्टनंट रैंक

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सुभेदार मेजर रमेश धानू गावडे सेवा निवृत्त ( Indian Army) गाव कोदाळी (चंदगड) याना आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती Suprem Commander of Armed Forces याच्याकडून या 15 ऑगस्ट 2022 रोजी ऑनररी लेफ्टनंट रैंक जाहीर केली आहे. हा ऑनर चंदगडमधील कोदाळी सारख्या दुर्गम भागातील एका सैन्यदलाच्या …

Read More »

कोल्हापूर पोलिसांच्या सायकल रॅलीने केला गडहिंग्लज उपविभागाचा दौरा

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर पोलिस दलातील १२ अधिकारी व ठाणे अंमलदार यांनी आज दि. १४ ऑगस्ट रोजी गडहिंग्लज उपविभागात सायकल रॅली काढून स्वातंत्र्याचा जयघोष केला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे या पोलिस दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील यांनी केले, सरपंच आशिष …

Read More »

कडलगे बुद्रूक येथे हर घर झेंडा उपक्रमांतर्गत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न…

  चंदगड : कडलगे बुद्रूक येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे आज पहिल्या दिवशी 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07.30 वा. देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ गावातील ज्येष्ठ माजी सैनिक श्री. लक्ष्मण रवळू पाटील व श्री. सटूप्पा व्हळ्याप्पा कांबळे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम साठी लोकनियुक्त सरपंच सुधीर गिरी, उपसरपंच सौ. …

Read More »

वैष्णवी कदम वत्कृत्वमध्ये चंदगड तालुक्यात प्रथम

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत चंदगड पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंदगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) ची इयत्ता ८वीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी युवराज कदम हिने प्रथम क्रमांक मिळवला. विशेष …

Read More »

हर घर तिरंगा जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरची जनजागृती फेरी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने फेरी काढण्यात आली. प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी विविध घोषणा देत संपूर्ण अडकूर गावातील सर्व गल्यातून काढण्यात आली. हातामध्ये …

Read More »

तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार

  चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …

Read More »