चालकाच्या प्रसंगावधानामुळे इतर प्रवासी सुखरूप तेऊरवाडी (एस.के. पाटील) : चंदगड -गडहिंग्लज या राज्यमार्गावरहुन नगीनहाळ (ता. गडहिंग्लज) गावाजवळील ओढ्यानजीक रस्त्याकडेला पडलेल्या झाडाला चुकविताना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर आगारातील दोडामार्ग-कोल्हापूर (बस क्रमांक एमएच -१४, बीटी,०५०९) या बसला अपघात झाला. बस झाडावर आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. आज (शनिवारी दि. ०६ ऑगस्ट …
Read More »जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन : डॉ. एन. टी. मुरकुटे
चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुरुमाऊलींचा सत्कार कार्वे : वाचन हा एक छंद आहे तो जोपासला तर सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. अनेक संकटावर मात करण्याच्या वाटा वाचनाच्या महामार्गावर सापडतात. जगणं समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे वाचन होय, असे प्रतिपादन यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. एन. टी. मुरकुटे यांनी केले. …
Read More »अहो काय सांगताय तरी काय? तेऊरवाडीत ३०० माणसे भात रोप लागणीला? तीन तासात चार एकर केली रोप लागण
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे तब्बल ३०० ग्रामस्थांनी एकत्र येत नियोजनबद्ध विविध गाणी गायनाचा आनंद लुटत चार एकर क्षेत्रावर चिखल केला. एवढेच नाही तर केवळ तीन तासात रोप लागणही पूर्ण करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे गाव करील ते राव काय करील? याचा प्रत्यय संपूर्ण …
Read More »अडकूर शिवशक्ती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी साधला संवाद
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड)च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध सुरक्षिततेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लजचे प्रशासक अभय देसाई, डे. सरपंच गणेश दळवी आदि मान्यवर …
Read More »गुडेवाडीच्या डाॅ. परशराम पाटीलांची अमित शहांसोबत शेती विषयावर चर्चा
चंदगड : कृषी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शहा देशभरातील तज्ज्ञांशी चर्चा करीत आहेत. याचं पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डाॅ. परशराम पाटील यांना चर्चेसाठी दिल्लीत आमंत्रण दिले होते. सहकारातून ग्रामीण भाग समृद्ध करून भारताला कृषी क्षेत्रात महाआर्थिक शक्ती बनवण्यासाठी अमित शहा …
Read More »अबब! चंदगडमधील कुदनूरमध्ये देशातील सर्वात उंच आश्वारूढ शिवमूर्ती बसवणार!
बेळगावात तयार होतेय महाराष्ट्राचे आराध्य दैवत तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील कुदनूर गावात प्रतिष्ठापना होणारी आश्वारूढ शिवमर्ती ही औरंगाबादप्रमाणे देशातील सर्वात उंच शिवमूर्ती पैकी एक असणार आहे. तब्बल २५ फूट उंच असणारी ही शिवमूर्ती बेळगाव शहरात घडवली जात आहे. यासाठी मूर्तिकारांची रात्रंदिवस धडपड चालू आहे. सीमाप्रश्नासाठी बेळगाव …
Read More »कोल्हापूरचं ठरलं, हसन मुश्रीफ-संजय मंडलिकांमध्ये रंगणार लोकसभेची कुस्ती?
कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ज्या आमदारांच्या मदतीने प्रा. संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेचे मैदान सहजपणे मारले, त्याच मंडलिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या कुस्तीत खासदार धनंजय महाडिक हे प्रचाराचे भाजपचे प्रचार प्रमुख असणार हे विशेष. शिंदे …
Read More »मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मनसेचे राज्य अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन महिन्यात मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे यांनी चंदगड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना रेनकोट आणि छत्र्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी चंदगड तालुका हा पर्यटनाचा स्वर्ग असुन चंदगड तालुक्याचे पर्यटन …
Read More »अडकूर येथे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान, सुदैवाने निराधार वृद्धा वाचली
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय ६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने वाचली. अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या …
Read More »चंदगडमधील १८ते ५९ वयोगटातील नागरिकांनी बूस्टर डोसचा लाभ घ्यावा : तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्य चंदगड तालुक्यामध्ये आज दि. १५ जुलै पासून तिसरा बुस्टर डोस देण्यात येत असल्याची माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली. आज दि. १५ जूलै पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत हा बूस्टर डोस देण्यात येणार …
Read More »