Sunday , December 7 2025
Breaking News

चंदगड

चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांची ८८ जयंती रक्तदान शिबिराने साजरी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त आज म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली.या रक्तदान शिबिरमध्ये पंचक्रोशितिल एकूण 70 तरुणांनी रक्तदान केले. तसेच स्व. नरसिंगराव पाटील यांचा म्हाळेवाडी येथील सहकार संकूलनामध्ये अर्धपुतळ्याचे आमदार …

Read More »

तेऊरवाडी येथे राहणाऱ्या महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

होसूरजवळ घडला अपघात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देवदर्शन करून येणाऱ्या दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून या प्रकरणी चंदाप्पा शंकर लमाणी (वय 39, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ – …

Read More »

चंदगड काँग्रेसचा केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणाविरोधात चंदगड तहसिलवर भोंगा मोर्चा

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : केंद्रातील भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे त्रस्त जनतेचा आक्रोश व जनतेच्या मनातील भावना विविध माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यासाठी चंदगड तालूका काँग्रेसच्या वतीने चंदगड तहसिल कार्यालयापर्यंत जुमला (भोंगा) आंदोलन करून तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन दिले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले व जिल्हा …

Read More »

शालेय पोषण आहारात प्लास्टिकचा नव्हे, फोर्टिफाईड तांदूळ शिक्षणाधिकारी : आशा उबाळे

चंदगड तालूक्यातून शिवसेनेने केली होती तक्रार तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शालेय पोषण आहारातून प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदळाचा, किलोमागे दहा ग्रॅम या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा वजनास हलका आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगतो आहे. विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म त्यामुळे पाण्यात घातल्यास …

Read More »

देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा : जलसंपदामंत्री जयंत पाटील

नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देशात महागाईचा कळस झाला आहे. जेथे महागाई विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तेथे भोंगे कोठे लावायचे आणि कोठले काढायचे याचीच जास्त चर्चा होत आहे. या सर्वाना मूठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कोल्हापूरच्या दोन …

Read More »

कोवाड ताम्रपर्णी नदितील गाळ व अतिक्रमण काढण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोवाड व्यापारी संघटनेने आज …

Read More »

राष्ट्रवादी अपंग सेल तालुका अध्यक्षपदी राजाराम जाधव यांची निवड

चंदगड : चंदगड तालुका राष्ट्रवादी अपंग सेलच्या अध्यक्षपदी जनतेच्या व अपंग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यात प्रयत्नशील, देवरवाडी गावचे कार्य कुशल नेतृत्व व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री. राजाराम हिरामणी जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी. संदीप नागरदळेकर, तुकाराम पाटील, बाजीराव पाटील तर खजिनदार पदी यल्लापा सनदी यांची …

Read More »

महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावारील ’रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

तेऊरवाडी : महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मल्ल विष्णू जोशीलकर यांच्या जीवनावर आधारित ‘रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 17 रोजी आयोजित केला आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे. पत्रकार पी. ए. पाटील आणि सदानंद …

Read More »

१८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाचे आयोजन

  कृतज्ञता पर्वातील विविध कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला …

Read More »

सर्वधर्म समभाव ठेवूनच विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार राजेश पाटील

अडकुर येथील विविध 1 कोटी 35 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवरच आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. घटनेत दिलेले मूलभूत अधिकार आणि आंबेडकर यांनी घालून दिलेल्या बुद्धांच्या विचारावरच या देशांमध्ये शांतता नांदावी. सर्वधर्म समभाव आपल्यात असावा आणि सर्व जाती, …

Read More »