Thursday , December 11 2025
Breaking News

महाराष्ट्र

हर हर महादेव चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले!

  मुंबई : ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक …

Read More »

शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाला हिंसक वळण; वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक …

Read More »

डॉ. भारती पाटील यांनी नव्या जाणिवेचा डोळस विद्यार्थी घडवला : डॉ. किशोर बेडकीहाळ

कोल्हापूर : डॉ. भारती पाटील यांच्या अध्ययनातून नव्या जाणिवेचा डोळस विद्यार्थी घडविलेला आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. किशोर बेडकीहाळ यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, माजी विद्यार्थी संघटना आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीने राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. भारती पाटील यांच्या …

Read More »

4 वर्षांच्या मुलासह बापाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील वादाचा वचपा काढण्यासाठी बाप लेकाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलासह 37 वर्षीय बापाचा शेतात गाठून खून करण्यात आला आहे. काल (दि. 04) रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती …

Read More »

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

  सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला …

Read More »

अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट

 कोल्हापूर (जिमाका): पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. यावेळी आमदार ऋतुराज …

Read More »

सकल मराठा परिवारातर्फे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  सीमाप्रश्न पंतप्रधानांनी सोडविण्याची मागणी! कोल्हापूर : भाषावार प्रांत रचनेनंतर गेली ६० वर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्राच्या – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रमध्ये करावा, यासाठी सकल मराठा परिवार कोल्हापूर मार्फत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात. गेली …

Read More »

मोरबी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावले ‘कालकुंद्रीचे पाटील’ 

कालकुंद्री : गुजरात राज्यातील मोरबी शहरात मच्छू नदीवरील झुलता पूल तुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे दीडशे लोक मरण पावले. शंभर लोकांची  मर्यादा असलेल्या या ७०० फूट लांबीच्या लोखंडी रोपवेवर आधारित झुलत्या पुलावर पाचशे लोक एकाच वेळी चढले. जुना झुलता पूल काढून चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या नव्या पुलाला हा भार सहन झाला …

Read More »

वाहनाच्या धडकेत वारीला पायी निघालेल्या 6 वारकऱ्यांचा मृत्यू

  सोलापूर : सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी …

Read More »

देवरवाडी ग्रामसभा वादळी चर्चेत संपन्न

चंदगड : देवरवाडी ता. चंदगड येथील ग्रामसभा दि.२०/१०/२०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, देवरवाडी येथे ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडली. मागील सभा कोरम अभावी तहकूब झाल्याने या ग्रामसभेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी उल्लेखनीय उपस्थिती दाखविली. या ग्रामसभेत १५व्या वित्त आयोगातील योजना …

Read More »