मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. रायगडसह आसपासच्या परिसरात नाकाबंदी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली आहे. …
Read More »मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाचा संशय बळावत चालला आहे. मेटे यांच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मेटेंचा मृत्यू घातपात आहे की अपघात याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मेटेंचा मृत्यू संशयास्पद असल्याचं पत्नी ज्योती मेटे यांनी सांगत …
Read More »एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुख घोषित; सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे रवींद्र माने यांची नियुक्ती
कोल्हापूर : एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुखांची घोषणा खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नेमण्यात आले आहे. सुजित चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर …
Read More »हिंदु सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण केल्याने 230 खटले दाखल; तर वर्षभर वाजणार्या मशिदींवरील भोंग्यावर मात्र 22 खटले!
कोल्हापूर : वर्ष 2015 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून 230 खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ 22 खटले दाखल आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यातील एकूण 252 खटल्यांपैकी 230 खटले हे …
Read More »कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न
कोल्हापूर (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने …
Read More »‘आले रे आले ५० खोके आले…गद्दार हाय हाय’, मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली …
Read More »७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘एसटी’ मोफत; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवासभाड्यात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता …
Read More »बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय पाटील यांना “भारत कर्तव्यम्” समाजभूषण पुरस्कार
पद्मश्रीकार डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात यंदाचा “भारत कर्तव्यम्” समाज भूषण पुरस्कार चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय केदारी पाटील यांना प्रदान करण्यात आला. …
Read More »कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा!
कोल्हापूर : राज्यासह कोल्हापूरमध्ये काल स्वातंत्र्यदिन अपूर्व उत्साहात साजरा होत असताना त्याला गालबोट लावण्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. शहरातील शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्या कार्यक्रमात भर दिवसा डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नाचवत असलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याने संतापाची लाट …
Read More »भाजपकडून विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी तयारी, राम शिंदेंचं नाव आघाडीवर!
मुंबई : शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक मलाईदार खाते भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. आता भाजपने विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही नव्याने सादर केली जाणार आहे. उद्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta