Friday , June 5 2026
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच

Spread the love

 

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असल्याने अगोदरच भरलेल्या धरणांमधून विसर्ग सुरु झाला आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या तीन स्वयंचलित दरवाज्यातून 4 हजार 284 क्युसेकने, तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. दोन्ही मिळून राधानगरी धरणातून 5 हजार 884 क्युसेकने भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा 10 वाजून 55 मिनिटांनी उघडला. त्यानंतर आणखी दोन दरवाजे उघडले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे थैमान सुरु आहे. आज सकाळपासून शहर परिसराह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.
राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राजाराम बंधार्‍याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे मोसमात चौथ्यांदा राजाराम बंधार्‍यावर पाणी आले आहे. त्याचबरोर रुई आण इचलकरंजी बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *