Wednesday , December 10 2025
Breaking News

महाराष्ट्र

कडलगे बुद्रूक येथे हर घर झेंडा उपक्रमांतर्गत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न…

  चंदगड : कडलगे बुद्रूक येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे आज पहिल्या दिवशी 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07.30 वा. देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ गावातील ज्येष्ठ माजी सैनिक श्री. लक्ष्मण रवळू पाटील व श्री. सटूप्पा व्हळ्याप्पा कांबळे या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम साठी लोकनियुक्त सरपंच सुधीर गिरी, उपसरपंच सौ. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आक्रमक; शिवसैनिकांचीही धरपकड

  कोल्हापूर : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौर्‍याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत होते. शिवसैनिक या ठिकाणी जमू लागल्यानंतर पोलिसांनी संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍यात …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

  कोल्हापूर (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे स्वागत …

Read More »

वैष्णवी कदम वत्कृत्वमध्ये चंदगड तालुक्यात प्रथम

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत चंदगड पंचायत समिती व शिक्षण विभाग यांच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंदगड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) ची इयत्ता ८वीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी युवराज कदम हिने प्रथम क्रमांक मिळवला. विशेष …

Read More »

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

  आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आशिष शेलार हे या …

Read More »

पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा

  कोल्हापूर : गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली …

Read More »

माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल : पंकजा मुंडे

  मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात …

Read More »

हर घर तिरंगा जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरची जनजागृती फेरी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने फेरी काढण्यात आली. प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी विविध घोषणा देत संपूर्ण अडकूर गावातील सर्व गल्यातून काढण्यात आली. हातामध्ये …

Read More »

खासदार संजय मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

  कोल्हापूर : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालेले कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार मंडलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत संजय मंडलिक यांनी भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा …

Read More »

’अलमट्टी’तून दोन लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु

  कोल्हापूर : अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून पाण्याचा विसर्ग दोन लाखांवर नेण्यात आला. अलमट्टी धरण 95 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व …

Read More »