नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. या सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापीठासमोर ही …
Read More »राज्यात तातडीने ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करा ! : हिंदु जनजागृती समितीची मागणी
कोल्हापूर : पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल’, असे सांगत आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ मिशनर्यांना अटक केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार; 18 जणांनी घेतली शपथ
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट व भाजपकडून प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), चंद्रकांत पाटील (कोथरूड), सुधीर मुनंगटीवार (बल्लारपूर), विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे (औरंगाबाद …
Read More »ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन …
Read More »अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
कोल्हापूर : अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार दमदार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 …
Read More »तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार
चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …
Read More »महागावजवळ ट्रकने कारला ठोकर दिल्याने कारचे मोठे नुकसान; सुदैवाने कारचालक वाचला
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अपघातांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लाकूरवाडी घाटात महागाव (ता गडहिंग्लज) नजीकच्या मोठ्या वळणावर ट्रक (नं. MH09CV2786) याने नेक्सॉन कार (नं. MH09 FV4883) ला समोरून धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने समोरील एअर बॅग खुलल्याने कारचालक उदय कोकितकर (नरेवाडी, ता. गडहिंग्लज) या अपघातातून बचावले. या अपघातात …
Read More »दोडामार्ग-कोल्हापूर बसला हुनगीनहाळ नजिक अपघात, दोन प्रवासी जखमी
चालकाच्या प्रसंगावधानामुळे इतर प्रवासी सुखरूप तेऊरवाडी (एस.के. पाटील) : चंदगड -गडहिंग्लज या राज्यमार्गावरहुन नगीनहाळ (ता. गडहिंग्लज) गावाजवळील ओढ्यानजीक रस्त्याकडेला पडलेल्या झाडाला चुकविताना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर आगारातील दोडामार्ग-कोल्हापूर (बस क्रमांक एमएच -१४, बीटी,०५०९) या बसला अपघात झाला. बस झाडावर आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. आज (शनिवारी दि. ०६ ऑगस्ट …
Read More »शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम यादी तयार!
मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून मंत्रिमंडळाची अंतिम यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्याचवेळी ही अंतिम यादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या …
Read More »गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीमध्येही आरोपी निश्चिती होऊ शकली नाही. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यावेळी आरोप निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी 7 संशयित न्यायालयात हजर होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, गोविंद पानसरे हत्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta